मित्रांनो, बऱ्याच वेळेस आपण सर्वांनाच असे वाटते की आपण आपला स्वतः चा व्यवसाय सुरु करावा. पण योग्य मार्गदर्शन न भेटल्यामुळ आपण business करत नाही. तर त्यासाठीच आज आम्ही तुमच्या साठी घेउन आलो आहे व्यवसाय मार्गदर्शन मराठी. आम्ही तुम्हाला व्यवसाय सुरु करण्यासाठी कोणत्या गोष्टींची गरज लागते किंवा व्यवसाय कसा करावा ह्या बद्दल माहिती देणार आहोत.
मित्रांनो, नौकरी करायची किंवा व्यवसाय करायचा हा निर्णय, प्रत्येक झण आप आपल्या choice आणि परिस्थिती च्या according घेत असतो. कोणाला नौकरी मध्ये interest असतो तर कोणी दुसर्यांच्या हाताखाली काम करायला अजिबात पसंत नाही करत.
त्यांना त्यांच्यावर कोणी हुकुमशाही केलेली अजीबात आवडत नाही. शिवाय त्यांना त्यांच्या कामात कोणी ढवळाढवळ केलेली सुद्धा चालत नाही. तर अश्या लोकांनी कधीच नौकरीच्या नादात न लागता सरळ आपला स्वतः चा व्यवसाय सुरू करायला पाहिजे.
व्यवसाय मार्गदर्शन मराठी
मित्रांनो तुम्हाला ही जर का स्वतःचा boss स्वतः बनायचा असेल,नौकरी करायची नसेल आणि स्वतः चा व्यवसाय सुरू करायचा असेल, तर तो कसा करावा, कुठुन सुरुवात करावी, कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात इत्यादी अनेक प्रश्न तुमच्या मनात असतील. तर मित्रांनो, मग आज चा हा article शेवट पर्यंत नक्की वाचा, तुम्हाला तुमच्या सर्व प्रमुख प्रश्नांची उत्तरं नक्कीच भेटतील.
तुम्हाला आम्ही संपूर्ण उद्योग व्यवसाय माहिती, म्हणजे व्यवसाय कसा निवडावा,कसा करावा तथा त्यात कशी प्रगती करावी सगळं विस्तार पूर्वक सांगणार आहे.
तर मित्रांनो, व्यवसाय हा शब्द ऐकायला जितका सोपा वाटतो, तितकच त्याचे मार्ग कठीण आणि खडतर आहे. मित्रांनो, व्यवसाय म्हणटलं की risk हा factor आलाच समजा. Market ची competition, उतार चढाव, profit and loss हे कोणत्याही Business चे अपरिहार्य घटक आहेत.
पण मित्रांनो, हे ही खरं आहे की जर तुम्ही प्रामाणिक पणे प्रयत्न केला, चांगली मेहनत घेतली आणि काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर मग कोणताच प्रवास खडतर राहणार नाही आणि तुम्हाला यश नक्कीच मिळेल.
मित्रांनो, सांगण्याचा अर्थ असा की तुम्हाला जर का Business करायचाच मन आहे तर तुम्हाला खुप तैयारी करुनच ह्या क्षेत्रात उतरावं लागेल. तुम्हाला सगळ्या योजना नीट आखुन, पूर्व नियोजित तैयारी करुन आणि खूप विचार करुनच ह्या क्षेत्रात यावं लागतं.
शिवाय तुम्हाला भरपूर शारिरीक आणि मानसिक श्रम तर करावं लागेल तर तुमची त्याची सुद्धा तैयारी असली पाहिजे. मित्रांनो, चला तर मग आपण पाहुयात की, स्वतः चं व्यवसाय सुरू करायला त्या कोणत्या प्रमुख आणि अत्यावश्यक गोष्टी आहेत ज्या आपल्याला लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे.
1. Strong Business plan/ strategy
मित्रांनो, कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी एक strong business plan असणं फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला कोणत्या प्रकार चा व्यवसाय करायचा आहे, त्याच्यासाठी काय गरजेचं आहे, किती भांडवल लागणार आहे, व्यवसाय कुठे उघडायचा आहे इत्यादी अनेक गोष्टींचा सखोल विचार आणि अभ्यास करणं अत्यंत आवश्यक आहे. तुमचा business plan जितका चांगला आणि effective असेल तितकाच तुमचा business grow करेल.
Also Read:
18 फायदेशीर Business ideas in Marathi
2. व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक नियोजन / financial planning
मित्रांनो, कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारी सगळ्यात महत्त्वाची वस्तू म्हणजे पैसा किंवा भांडवल. तुम्हाला व्यवसाय सुरू करायला पैश्याची गरज लागणार आहे तर त्याच्या साठी तुम्ही सोय कशी करणार आहात,आधी तुम्हाला ते पहावं लागेल.
तुम्ही तुमच्या बचतीचे पैसे उपयोग करत असाल तर उत्तमच आहे नाहीतर तुम्हाला बैंके कडून loan सुद्धा घेता येऊ शकतं. एकदा व्यवसाय मार्गी लागला की वेळोवेळी त्याचे हप्ते भरुन ते लोन फेडायला त्रास होणार नाही.
मित्रांनो, तसं तर आजकाल बिन भांडवली व्यवसाय म्हणजे Zero Investment Business सुद्धा खूप सारे आहेत, ज्याच्यात तुम्ही अगदी शुल्लक पैसे लावून सुद्धा आपला व्यवसाय करु शकतात. शिवाय घर बसल्या करता येणारे सुद्धा खूप सारे Business आहेत.
मित्रांनो, तुम्हाला आपल्या व्यवसाया साठी जर घरातूनच एखादा निवेशक मिळाला म्हणजे भाऊ, बहीण किंवा आई बाबा तर फार उत्तम होईल. लोन वर लागणारं व्याज पण वाचेल.
3. व्यवसाय कसा निवडावा
मित्रांनो, तुम्हाला ज्या क्षेत्रात आवड आहे तुम्ही त्याच्याशी related असा business निवडावा, तुम्हाला लवकर success मिळते. हे एक मनोवैज्ञानिक सत्य आहे. उदाहरणार्थ तुम्हाला स्वतः ला जर का खाण्याची आवड आहे तर तुम्ही hotel किंवा restaurant संबंधित व्यवसाय निवडला तर तुम्हाला जास्त यश मिळू शकतं.
कारण तुम्ही त्याच्या संबंधित research जास्त चांगली आणि interest घेऊन करु शकतात. कधी कधी काही लोकांवर घरातील पारंपरिक व्यवसाय सांभाळायचा pressure असतो तर कधी दुसरा पर्याय नाही म्हणून नाइलाजाने तोच व्यवसाय करावा लागतो.
पण मुळात व्यवसायाची आवड असली तर त्यातही हळूहळू interest develope होतोच पण स्वतः च्या आवडीचा व्यवसाय केला तर तो लवकर successful होतो.
4. व्यवसाय करण्या साठी योग्य जागा
मित्रांनो, काही Business घरातल्या घरात किंवा खूप कमी जागेत होऊ शकतात, पण काही व्यवसाय असे असतात त्यांच्यासाठी तुम्हाला मशीनरी सारख्या मोठ्या वस्तुंची आवश्यकता असते तर त्या करता तुम्हाला मोठ्या जागेची गरज असते.
तुम्हाला तुमच्या Business च्या गरजा लक्षात घेऊन जी जागा फायदेशीर आहे ती निवडायला पाहिजे. तर त्या जागेचं rent आणि इतर गोष्टींचा पण तुम्हाला विचार करावा लागेल. जर का तुमचा Business असा आहे की तुम्हाला market मध्येच दुकान घ्यावी लागणार आहे तर मग त्या बरोबर हे सुद्धा पहावं लागेल की पार्किंग ची सोय बरोबर आहे की नाही.
जवळपास तुम्हाला competition खुप तर नाही आहे आणि त्या जागेचा crowd तुमच्या धंद्याला योग्य आहे का. 5 विश्वास पात्र आणि अनुभवी लोकांचा सल्ला घ्या.
मित्रांनो, तुम्ही स्वतःच मत तर लक्षात असुच द्या पण तुमच्या घरच्यांचा, मित्रांचा, जवळच्या लोकांचा सल्ला ही अवश्य घ्या. शिवाय जे लोकं Business मध्ये successful असतील त्यांचं तर अनुकरण कराच पण unsuccessful लोकांचं सुद्धा मार्गदर्शन घ्या, त्यांच्या चूका लक्षात घ्या आणि निर्णय घ्या.
5. Business Registration
मित्रांनो, आपला Business registered करवून घ्या. कोणत्या ही प्रकार चा व्यवसाय करण्यासाठी सरकार कडून परवानगी घेणं आवश्यक आहे. तर तुम्ही सुद्धा आपला व्यवसाय अवश्य register करुन घ्या. आणि business वाढवन्यासाठी Google my business ला रजिस्टर जरुर करा.
Also Read:
Homemade Business ideas in Marathi। घरी करता येणारे व्यवसाय
महिला गृह उद्योग | How to Start Mahila Gruh Udhyog in Marathi
घरी बसून पॅकिंग चे काम करून RS.30000 रुपए महिना कमवा
Conclusion:
तर मित्रांनो, ह्या काही गोष्टिंचं पालन करा आणि स्वतःचा व्यवसाय सुरु करा. मित्रांनो, हे सुद्धा लक्षात ठेवा की कोणत्याही कामात एकाएक यश नाही किंवा कोणत्याही व्यवसायाला चालना मिळायला वेळ लागतो. तर सुरवातीला जर का थोडं फार अपयश जरी मिळालं तर खचुन जाऊ नका, धीर ठेवा आणि प्रामाणिक प्रयत्न करत रहा. तुमच्या प्रयत्नांना यश नक्कीच मिळेल.
जर तुम्हाला आमचे हे आर्टिकल व्यवसाय मार्गदर्शन मराठी आवडले असेल तर ह्याला share नक्की करा.
धन्यवाद !