महिला गृह उद्योग कसा सुरू करावा ? | How to Start Mahila Gruh Udhyog in Marathi 2022

नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण how to start mahila gruh udhyog in marathi बद्दल माहिती घेणार आहोत.

मैत्रिणींनो, आजच्या ह्या काळात, जेंव्हा महागाई आकाशाला जाऊन पोहचली आहे, तर घरातल्या जमेल तेवढ्या लोकांनी घर खर्चात हातभार लावणं फार गरजेचं झालं आहे. मोठं कुटुंबं तर सोडाच पण चार जणांच्या लहानशा कुटुंबातही एकाच माणसाची income म्हणजे पगार sufficient  नसतो.

How to start mahila gruh udhyog in marathi

भारतात आजही अधिकांश बायका house wife आहेत. पण घर कामातुन वेळ मिळवुन त्यांची घर खर्चात काही तरी contribution करायची नक्कीच इच्छा असते.

जर का एखादी बाई घर खर्चात हातभार लावु इच्छित असेल पण मुलांच्या केंव्हा घरातील इतर जबाबदार्यां मुळे कामा साठी तिला घरा बाहेर पडणं शक्य नसेल तर, अश्या महिलांकरिता गृह उद्योग हा पर्याय खुप छान आहे.

थोडीशी Investment करून सुद्धा घरबसल्या ही व्यवसाय करता येतो. चक्क रेडिमेड सामान विकून तर कधी स्वतः बनवलेल्या वस्तुंचा व्यवसाय करुन सुद्धा पैसे कमावू शकतो.

आज आपण ह्या Article मध्ये हेच पाहणार आहोत कि महिलांनी गृह उद्योग कसा सुरु करावा. त्या करता कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत, किती investment करावी लागते, गृह उद्योग करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात आणि ह्याच बरोबर इतर काही महत्वाच्या गोष्टी पण जाणून घेऊया.

1. Education 

सगळ्यात आधी तर तुम्ही हा विचार डोक्यात असुद्या कि कोणताही business सुरू करायला फक्त basic education आणि व्यवहारिक बुद्धी म्हणजे business mind ची गरज असते मग तो मोठ्या रुपाचा व्यवसाय असो किंवा छोट्या स्वरूपातील गृह उद्योग असो.

तर हे झालं सगळ्यात basic investment. गृह उद्योग करताना तुमच्या हातात मोठी degree असणं गरजेचं नाही आहे.

2. Investment 

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भांडवल, investment. तसं पाहिलं तर महिलांसाठी आजकाल खूप सारे व्यवसाय तर असे आहेत ज्या मध्ये zero investment आहे.

तुमच्या smart phone चा वापर करुनच तुम्ही पैसे कमावू शकतात. शिवाय government सुद्धा आता mahila gruh Udyog साठी भरपूर सुविधा प्रदान करत आहे.

Training पासून तर अगदी शुल्लक दरा वर loan सुद्धा आरामात उपलब्ध करुन देत आहे. महिला उद्योजकांसाठी सरकारचे अनेक प्रकल्प सुरू आहेत. त्यात महिला उद्योग निधी योजना सारख्या योजना सामिल आहे.

व्यवसायाच्य सुरुवातीसाठी किती basic investment लागेल, त्यातून तुमच्या कडे किती पैसे आहेत आणि तुम्हाला किती पैश्यांची गरज आहे हे लक्षात घेऊन पुढे जा.

Also Read:

Online घर बसल्या Job करा आणि पैसे कमवा

18 फायदेशीर Business ideas in Marathi [2022]

3. Interest 

आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची रुची किंवा तुम्हाला ज्या गोष्टिचा व्यवसाय करायचा आहे, त्या गोष्टी बद्दलचं तुमचं knowledge किती आहे.

सांगण्याचा अर्थ असा की तुम्हाला जो व्यवसाय करायचा आहे त्या व्यवसाया संबंधित तुम्हाला कोणत्या training ची गरज आहे का, ते पण पहायला हवं. कोणाच्याही सांगण्यावरून आपल्या व्यवसायाची निवड नका करू, आधी स्वतःच interest आणि knowledge पाहून घ्या.

4. Place 

जागा, हो तुम्हाला जो व्यवसाय करायचा आहे, त्याच्या साठी तुमच्या कडे लहान का असो ना पण आवश्यक ती जागा आहे का.

कारण सुरवातीला छोट्या स्वरूपातील business साठी rent वर किंवा मोठी जागा घेण्यात अर्थ नाही आहे, पण समजा जर ती तुमच्या व्यवसायाची गरज असेल तर बजेट निश्चित करुनच सगळं ठरवा.

5. Man Power  

माणुस बळ, म्हणजे man power, सुरुवातीला तुम्हाला हे ही ठरवावं लागेल कि तुमच्या व्यवसायासाठी तुम्हाला initial stage वर किती man power  गरजेचं आहे.

सुरवातीला काम थोडं कमी असतं तर तुम्हाला जमेल तितकं काम जर स्वतः करुन घेतलं तर माणसांचा खर्च वाचतो.

6. Competition  

आज कोणताही business तो छोटा असला तरी त्यात प्रतिस्पर्धा मात्र मोठी असते, तर जर का तुम्हाला market मध्ये स्वताला उभं करायचं असेल तर तुम्हाला फार मेहनत घ्यावी लागणार आहे, हे लक्षात ठेवा.

त्यासोबतच तुमच्या प्रोडक्ट च्या गुणवत्ते बरोबर काहीच तडजोड केलेली चालणार नाही. एकदा का मार्केट मध्ये तुमचं नाव खराब झालं की पुन्हा नाव कमवायला वेळ लागतो.

7. Registration  

हे लक्षात ठेवा की business छोटा असो की मोठा कायद्यानुसार त्यांचं registration करावंच लागतं. तर जर तुम्ही सुद्धा gruh Udyog सुरू करताय तर तुम्हाला त्यांचं सरकारी खात्यात registration करावं लागेल.

आजकाल भरपूर companies आहेत, ज्या तुम्हाला तुमच्या business च्या registration सोबत GST registration सुद्धा करुन देतात.

किंवा सध्या online च्या युगात सरकार द्वारा नवीन entrepreneurs  ला प्रोत्साहित करण्यासाठी चालू केलेली, “उद्योग आधार” “Udyog Aadhar” योजने द्वारा online पद्धतीने सुद्धा तुम्हाला तुरंत registration करुन घेता येते.

तर मैत्रिणींनो अशे कितीतरी उद्योग आहेत जे तुम्ही तुमच्या स्वतःच्या बळावर सहज करु शकतात. तुमच्या साठी गृह उद्योग सुरू कराय साठी अनेक विकल्प उपलब्ध आहेत.

तुम्ही काय करु शकतात पहा-

1. मैत्रिणींनो जरा तुम्ही cooking मध्ये expert आहात तर तुमच्या कडे घरगुती business करायचे खुप options आहेत.

तुम्ही घरघुती जेवणाचे डबे, केक आणि अन्य bakery products, मसाले, पापड,लोणची, मिठाई, फराळ सारखे अनेक वस्तू घरच्या घरी बनवुन विकू शकतात. ह्या साठी खूप कमी  investment लागते आणि तुम्ही घर बसल्या तुमचा स्वतःचा उद्योग सुरू करु शकतात.

2. Beauty parlor, Boutique, daycare center, तसेच online business पण करू शकतात जसे content writing agency, Youtube channel, blogging, Affiliated marketing, सारखे अनेक व्यवसाय करु शकतात.

Conclusion:

तर मैत्रिणींनो, पुढे या आणि आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी एक पाऊल पुढे टाका. आपल्या गुणांचा वापर करून स्वतःच गृह उद्योग सुरू करा आणि घरातील खर्चात आपले सुद्धा योगदान करायचा आनंद घ्या.

तुम्हाला जर हे आर्टिकल how to start mahila gruh udhyog in marathi आवडले असेल तर ह्याला जास्तीत जास्त महिलांपर्यंत share नक्की करा.

धन्यवाद!

The Author

girheadinath@gmail.com

4 Comments

Add a Comment
  1. Rushikesh s landge

    Plz job me

  2. Priti Mangesh mendhe

    Mala ghari baslya kaam pahije.

  3. Amol Gajananrao Kadam

    I’m interested to see what you have for me best home bigness

  4. Plz mala job chi khup garaj ahe plz mala job dya

Leave a Reply

Your email address will not be published.