महिला बचत गट बिजनेस (मराठी) 2024

नमस्कार मैत्रिणिंनो, आज आपण Mahila bachat gat business in marathi बद्दल माहिती घेणार आहोत. आपल्या कमाई मधून थोड़े थोड़े पैसे बाजूला बचत करुण ठेवणे हा मानव धर्म आहे. Business man आणि Job करणारे लोक हे ह्या पैसांचे savings विविध bank, सहकारी संस्था या मध्ये करत असतात.

Advertisements

आज केलेली बचत भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी मदद करते आणि त्यावरच आपल्याला आपले समाजातील स्थान आणि ओळख मिळते. Savings आणि संघटन ह्याना एकत्र करून निर्माण झाला आहे एक आगळावेगळा पर्व म्हणजे बचत गट.

मैत्रिणिंनो, आपल्या देशात मध्यमवर्गीय किंवा त्याहूनही कमी आर्थिक स्थिती असणार्या लोकांच्या आर्थिक मदतीसाठी, प्रत्येक सरकार नवं नवीन योजना आणत राहते. बचत गट हा ही त्याचाच एक भाग आहे.

महिलांना सक्षम बनवण्यासाठी, सरकार विविध माध्यमातून त्यांना सतत पाठिंबा देत असते. महिला बचत गट द्वारे, महिलांना आर्थिक सहायता देऊन त्यांना त्यांच्या पाया वर उभं रहायला मदत केली जाते.

तर मैत्रिणिंनो, महिला बचत गट काय आहे? महिला बचतगटाचा उद्देश्य काय आहे? महिला बचतगट कसं काम करतं, म्हणजे महिला बचतगटांची प्रक्रिया काय आहे? महिला बचतगट, महिलांना आर्थिक सहायता कशी प्रदान करतं? इत्यादी प्रश्नं जर का तुम्हाला ही पडली असतील तर तुम्ही हा लेख जरुर वाचा. सगळ्यात आधी आपल्याला बचत गट हे नेमकं काय आहे, हे जाणून घ्यावं लागेल. चला पाहूया.

महिला बचत गट

महिला बचत गट हा महिलांना आर्थिकरित्या सक्षम बनवण्यासाठी एक चांगली संकल्पना आहे. महिला बचत गटात, काही महिला एकत्र येतात आणि नियमितपणे थोडीफार रक्कम, जसे ₹100-200, बचत करतात. ही बचत केली जाणारी रक्कम एकत्रित केली जाते आणि गटाच्या सदस्यांना कर्ज म्हणून दिली जाते.

बहुतेक वेळा ग्रामीण भागातील महिला बचत गट हे आर्थिक क्रियाकलापांसाठी कर्ज घेतात. जसे, एखादी महिला शेतीसाठी किंवा छोटे व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज घेऊ शकते. बचत गटामुळे महिलांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यास मदत होते.

महिला बचत गट बिजनेस सुरू करणे चांगले का आहे?

स्वयंरोजगार – महिला बचत गटातून कर्ज घेऊन महिला छोटे व्यवसाय सुरू करू शकतात जसे मसाला बनवणे, टेलरिंग, दुग्ध उत्पादन विक्री इत्यादी.
आर्थिक स्वातंत्र्य – स्वत:च्या उत्पन्नामुळे परपुरुषावर अवलंबून न राहता स्वातंत्र्य मिळते.
बचतीची सवय – नियमित बचत करण्याची सवय लागते.
गुंतवणूकचे साधन – महिलांच्या बचतीला योग्य गुंतवणुकीचे रूप मिळते.
सामाजिकीकरण – गटामुळे एकमेकांशी संवाद साधणे आणि अनुभव शेअर करणे शक्य होते.

महिला बचत गट बिजनेस सुरू करण्याचे पाऊल पडताळून टाकावे लागतील:

१. सदस्यांची निवड करा – आपल्या परिसरातील एकमेकींवर विश्वास असलेल्या महिलांची निवड करा.

२. नेमके किती सदस्य ठेवायचे याचा विचार करा. १० ते २० महिला एका गटासाठी योग्य राहील.

३. नियम आखा – प्रत्येकाने किती रक्कम भरायची हे ठरवा. उशिरा भरल्यास शुल्क लावण्याचा नियम असावा.

४. बैठकीचे वेळापत्रक ठरवा – दर महिन्याला एकदा किंवा दर तीन महिन्यांनी बैठका घ्याव्यात.

५. कर्ज वाटपाचे नियम ठरवा – कोणत्या सदस्यास किती रक्कमेपर्यंतचे कर्ज द्यायचे याचे निकष ठरवा.

६. व्याज दर निश्चित करा – दिलेल्या कर्जावर किती टक्के व्याज आकारायचे ते ठरवा.

७. कागदपत्रे तयार करा – करारनामे, हप्त्यांची पावती इत्यादी कागदपत्रे तयार ठेवा.

महिला बचत गट हा छोट्या पातळीवर सुरू होऊन मोठ्या स्तरावर विस्तृत होऊ शकतो. त्यातून महिलांना आर्थिक सक्षमीकरण मिळून त्या आत्मनिर्भर होऊ शकतात. म्हणूनच महिला बचत गट खूप महत्त्वाचे आहेत.

बचत गट म्हणजे काय

मैत्रिणिंनो, बचत गट हे स्वयंसाहाय्य गट Self help group म्हणून सुद्धा ओळखलं जातं. बचत गट हा एक असा उपक्रम आहे, ज्यात स्वैच्छिक रुपाने काही ठराविक संख्येत लोकं एकत्र येऊन एक अनौपचारिक संगठन (unofficial group) किंवा गट बनवतात.

आणि एका निश्चित कालावधी मध्ये एक ठरावीक रक्कम त्या गटात जमा करतात. आणि ह्या रकमेचा उपयोग, गटातील सदस्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी केला जातो. त्यांना सावकार किंवा bank पेक्षा कमी interest rate वर आवश्यकतेनुसार कर्ज काढून घेता येते.

एकत्रीकरणाचे सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे बचत गट होय. आपण लहानपणा पासून बरीच हिंदी शायरी ऐकली असेल जसे ‘ एक और एक ग्यारह’ किंवा ‘ एक से भले दो और दो से भले तीन’ यांचा खरा अर्थ बचत गट दर्शवितो. आणि आपल्याला business मधे अनुभव देतो.
बचत गट म्हणजे एकत्रीकरण, Savings, एकसमान विचार व स्वप्नांसाठी घेतलेली एकत्रित झेप होय.

बचत गटाचे काही नियम व कायदे असतात जे प्रत्येक गटातील सदस्यच ठरवतात आणि प्रत्येक सदस्याला ते मान्य करावे लागतात. बचत गटाची प्रत्येक प्रक्रिया अगदी पारदर्शक असते.

गटातील कोणत्याही सदस्याला जर का कर्जाची गरज असेल तर त्याला एका ठरावीक दरा वर गटातुन कर्ज घेता येते आणि मग ते कर्ज, हप्त्याने फेडायचे असतं. गटातील सदस्यांची संख्या 20 च्या वर नसली पाहिजे. 20 पेक्षा कमी मात्र असु शकते. साधारण पणे 10 ते वीस लोकांचा गट असु शकतो. बचत गटांसाठी सरकार कडून शुल्लक interest rate वर financial help प्रदान केली जाते.

Mahila bachat gat information in Marathi

महिला बचतगट हे महिलां सदस्यांचं बचत गट असतं. एकाच गावाच्या आणि एकाच क्षेत्राच्या महिला एकत्र येऊन, त्यांच्या बचतीच्या पैश्यांचं investment करतात. महिला बचत गटामुळे महिला स्वावलंबी तर होतातच, शिवाय कुटुंबातील अडचणी दूर करण्यात आणि त्यांच्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी, व्यवसायासाठी थोडी मदत सुद्धा करु शकतात.

महिला बचत गटांना तर सरकार कडून सुविधा ही उपलब्ध केल्या गेल्या आहेत. महिलांना स्वावलंबी करायच्या उद्देशाने महिला बचत गटांना, सरकार कडून वेळोवेळी मार्गदर्शन आणि प्रोत्साहन दिले जाते. शिवाय त्यांना एकत्रित व्यवसाय करायचा असेल तर योग्य प्रशिक्षण सुद्धा दिलं जातं.

तरी पण काही कारणांमुळे महिलांना, बचतगट स्थापन करायला किंवा त्यात आपल्या बचतीचे पैसे गुंतवायला प्रेरित करणं फार कठीण आहे. एकतर काही महिलांना स्वतः चे निर्णय स्वतः घ्यायचं किंवा आर्थिक स्वातंत्र्य नसतं, काही जणी पैसे टाकायला घाबरतात, काही जणींना पैसे जमवायला अवघड जातं अशे बरेच कारणं आहेत जे मुख्यतः महिलांच्या बाबतीत असु शकतात.

पण त्यांना जर का, बचत गटाचे फायदे व्यवस्थित प्रकारे समजावून सांगितले तर त्यांना सुद्धा बचतगटाची संकल्पना समजेल आणि त्या सुद्धा ह्या कामासाठी नक्कीच पुढे येतील.

Also Read:

महिला गृह उद्योग | How to Start Mahila Gruh Udhyog in Marathi 2024

Homemade Business ideas in Marathi। घरी करता येणारे व्यवसाय

मैत्रिणिंनो, एकदा काय 10- 20  महिलांचा बचत गट तैयार झाला की, मग पुढच्या गोष्टींचा विचार करावा लागतो. त्या म्हणजे गटाचे नियम कायदे ठरवणं, कर्जाची रक्कम, कर्जाची कालावधी, परतफेड, हप्ते ठरवणं इत्यादी.

आणि विशेष म्हणजे हे सगळं गटाचे सदस्यच एका पारदर्शक प्रक्रियेत ठरवतात. काही गट प्रमुखांची निवड केली जाते. पण गटातील सर्व सदस्यांचे अधिकार एक सारखे असतात. वेळोवेळी गटाच्या कामाचं मूल्यमापन केलं जातं.

सगळे सदस्य ठरावीक दिवशी, ठरावीक रक्कम जमा करताय की नाही, सगळे एकमेकांना समजून घेऊन सहयोग करताय की नाही, गटातील नियमांचे पालन करताय की नाही, कर्जाची परतफेड वेळोवेळी करताय की नाही, घेतलेल्या कर्जाचा उपयोग, त्याच कामासाठी होतोय की नाही,  ह्या सगळ्यांचं लक्ष ठेवलं जातं. साधारण पणे हे मुल्यमापन गट स्थापनेच्या तीसर्या आणि सहाव्या महिन्यात केलं जातं.

महिला बचतगटाच्या पहिल्या meeting मध्ये सगळं decide झालं की ,गटाचं नाव ठरवुन जवळच्या National bank मध्ये त्या नावाने saving account open केले जाते. आणि दर महिन्याला सदस्यांकडून एकत्रित केली गेलेली रक्कम त्यात जमा केली जाते.

Mahila bachat gat yojana in Marathi

महिला बचतगटांना सरकार कडून तर support मिळतोच शिवाय काही banks सुद्धा वेळोवेळी विविध योजनां मार्फत आपलं सहकार्य करतात. बचत गटांना, ग्रामीण विकास यंत्रणे कडून स्व:रोजगारासाठी अनुदान दिले जाते आणि बॅंक कडून कर्ज ही दिले जाते.

तसेच व्यवसायासाठी, जमीन खरेदी साठी, घर बांधण्यासाठी सुद्धा कमी व्याजदराने कर्ज दिले जाते. महाराष्ट्र सरकारने महिला बचत गटांना बॅंके कडून घेतलेल्या कर्जाचं मुद्रांक शुल्क म्हणजे Stamp duty माफ केली आहे. आता प्रश्न असा आहे की महिलांनी बचत गटचं registration कसं कराव.

Mahila bachat gat registration

मैत्रिणिंनो, तसं तर बचत गटाचं registration करणं compulsory नसतं, पण registration केल्या शिवाय सरकारी योजनांचा फायदा घेता येत नाही. तर ग्राम पंचायत, महानगरपालिका ह्या संस्थेचे अधिकारी, NABARD इत्यादी संस्थान कडून तुम्हाला बचत गट/ महिला बचत गट चे registration करता येते.

Mahila bachat gat business in marathi ideas

मैत्रिणिंनो, तुम्ही तुमच्या बचत गटाच्या माध्यमातून विविध business सुरु करू शकता. आम्ही येथे काही business ideas देत आहोत.

 • पापड़, लोणचे किंवा मसाल्याचे पदार्थ करून विकने
 • मेनबत्ती, अगरबत्ती, पत्रावळी, द्रोन, तयार करने
 • सोंदर्य प्रसादने तयार करने
 • शिवन कामे घेणे
 • भाजीपाला, फुलांची Nersary तयार करून रोपे विकने
 • Hotel, खानावळ चालू करने
 • शेती बियाने तयार करून विकने
 • शेळीपालन
 • कुकुटपालन
 • विमा एजेंट होने
 • पाळना घर चालू करने
 • फळ किंवा उसाचे रसवंती चालू करने
 • किराना मालाचे दुकान सुरु करने

Conclusion:

मैत्रिणिंनो, महिलांनी त्यांच्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी, स्वावलंबनासाठी, आणि स्व: रोजगारासाठी, एकत्र येऊन  महिला बचत गट स्थापन करायला पाहिजे किंवा त्यात सदस्यता घ्यायला पाहिजे.

तुम्हाला mahila bachat gat business in marathi हा आमचा लेख आवडला असेल तर ह्याला जास्तीत जास्त share नक्की करा.

धन्यवाद!

Also Read:

WhatsApp