Top 10-Small Business ideas: सुरु करा कमी पैशामध्ये मोठा Business


आपली भारतीय बाजारपेठ खूप मोठी आहे Small business ideas in-मराठी. आपल्या बाजारपेठेमध्ये लहानापासून मोठ्यांपर्यंत खूप व्यवसाय आहेत.मोठा व्यवसाय करायचा म्हणलं की मोठ्या प्रमाणात भांडवलाची आवश्यकता असते.

Table of Contents

Top 10-Small business ideas in मराठी

आपण छोटया व्यवसायापासून सुद्धा चांगल्या प्रकारची कमाई करू शकतो.अशाच 10 small business ideas बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.          

1) Fast फुड्स business

आज आपण जर पाहिलं तर तोंडाची चटक म्हणजे fast food होय. मोठ्या शहरांमधे लोकांकडे अगदी कमी वेळ असतो. त्यामुळे  लोक कमी वेळेमध्ये खाणे  पसंद करतात . त्यामध्ये चांगल्या प्रकारचे व उत्तम दर्जाचे रुचकर fast food देऊन अगदी एकदम कमी खर्चामध्ये fast foods चा व्यवसाय उभा करू शकतो.

फास्ट फूड मध्ये अनेक पदार्थ येत असून वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ तयार करून आपण आपल्या शॉप मध्ये ठेवू शकतो. तुम्ही जर तुमच्या पदार्थाचा दर्जा व कॉलिटी चांगली ठेवत असाल तर लोकांची मागणी ही तुमच्याकडे जास्त प्रमाणामध्ये असेल.

लोकांचं खाणं कधी बंद होणार नाही त्यामुळे हा उद्योगही कधी धोक्यात येणार नाही त्यामुळे तुम्ही हा उद्योग चालू करून मोठ्या प्रमाणात नफा कमवू शकता.

2) टेलरिंग business.

आजच्या युगमध्ये मानवाच्या महत्त्वाच्या गरजा म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा आहेत. त्यामधील एक गरज म्हणजे  म्हणजे (वस्त्र) होय. त्यामध्ये आपण पाहतो की खूप लोकं ready-made कपडे वापरण्या ऐवजी शिवून कपडे घालणं पसंद करतात .

कपडे शिवायचं म्हटलं की टेलर कडे यावच लागतं त्यामुळे आपण कमी भांडवलाची गुंतवणूक करून टेलरिंग व्यवसाय उभा करू शकतो, हा व्यवसाय भविष्यामध्ये कधीही बंद न पडणारा व्यवसाय आहे . त्यामुळे आपण गावाकडे किंवा शहर शहरांमध्ये हा व्यवसाय चालू करू शकतो व चांगल्या प्रमाणामध्ये आपण कमाई करू शकतो.

3) पीठ गिरणी व्यवसाय.

आपण जर पाहिले तर गावाकडे रोजगाराच्या खूप कमी प्रमाणात संधी उपलब्ध असतात. रोजागाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी लोकांची मोठ्या प्रमाणात धडपड चालू असते.
पीठ गीरणी हा व्यवसाय मानवासाठी अत्यावश्यक आहे .त्यामुळे आपण गावाकडे राहून कमीत कमी पैश्याची गुंतवणूक  करून पीठ गिरणी व्यवसाय उभा करून चांगल्या प्रकारे रोजगार मिळवू शकतो.
या व्यवसायामध्ये जास्त मानव बळ लागत नाही त्यामध्ये तुम्ही एकटे चालू शकता आणि चांगल्या रोजगाराची संधी उपलब्ध करू शकता.

4) किराणा दुकान उद्योग.

किराणा दुकान हा एक असा व्यवसाय आहे की तो कायमस्वरूपी चालेल . त्यामुळे किराणा दुकान हा व्यवसाय अगदी कमी जागेमध्ये आपण उभा करू शकतो. व चांगल्या प्रकारे कमाई करू शकतो.

5) गिफ्ट shop.

कोणताही प्रोग्राम असो या लग्न सोहळा असो आपण आपल्या मित्रांना किंवा नातेवाईकांना गिफ्ट हे नेत असतो. त्यामुळे प्रोग्राम कोणताही असो गिफ्ट ची मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री होत असते.त्यामधे वेगवेगळ्या प्रकाचे गिफ्ट आपण आपल्या shop मधे ठेऊ शकतो .
आपण हा व्यवसाय अगदी कमी जागेमधे चालू करू शकतो.  चांगले locationपाहून आपण आपला व्यवसाय उभा करू शकतो.

5) कोचिंग क्लासेस.

आज काल जर आपण जर पाहिले तर गावाकडे चांगल्या प्रमाणात आणि उच्च दर्जाचे शिक्षण भेटत नसून गावाकडील मुलं शहरांमध्ये येत असतात त्यामुळे तुम्ही गावाकडे किंवा शहरातही तुमचे कोचिंग क्लासेस सुरू करू शकता .
तुम्ही जर चांगल्या प्रकारे टीचींग करू शकत असाल तर तुम्ही कोचिंग क्लासेस चालवून चांगल्या प्रकारे कमाई करू शकता. गावाकडेही तुम्ही स्वतःच्या घरामधे सुद्धा स्वतःचे कोचिंग क्लासेस चालू करू शकता
त्यासाठी तुम्हाला चांगली जाहिरात करणे गरजेचे असेल.त्यामुळे तुमच्या क्लासमध्ये मुलांची मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होऊ शकते. चांगल्या प्रकारच्या concept मुलांना व नॉलेज देऊन चांगल्या प्रकारे क्लासेस चालू शकता.

Also Read:

घरी बसून पॅकिंग चे काम करून RS.30000 रुपए महिना कमवा

Homemade Business ideas in Marathi। घरी करता येणारे व्यवसाय

6) स्टेशनरी दुकान.

आपण जर पाहिले तर कॉलेज,शाळा यांच्या पुढे छोट्यापासून ते मोठ्यांपर्यंत shop असतात. अगदी लहान मुलांपासून कॉलेजच्या मुलांपर्यंत शिक्षण चालू असताना मुलांना शैक्षणिक साहित्याची मोठ्या प्रमाणात गरज असते त्यामध्ये आपण आपल्या दुकानांमध्ये या साहित्याची गरज मुलांना पुरवू शकतो आणि मोठ्या प्रमाणात नफा कमवू शकतो.
या दुकानामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असते त्यामुळे आपणही चांगली जागा पाहून आपले दुकान चालू करू शकतो.

7) दूध डेअरी व्यवसाय.

दुधापासून मोठ्या प्रमाणात विशिष्ट पदार्थ बनत असतात.गाव असो वा शहर असो दूध हा अत्यावश्यक पादार्थ असल्यामुळे लोक दूध व दुधापासून तयार होणारे पदार्थ मोठया प्रमाणात खरेदी करत असतात. त्यामुळे दूध डेअरी चा व्यवसाय
चांगल्या प्रकारे चालू शकतो. 
त्यामध्ये पनीर,दूध, मिठाई, दही ,अशा विशिष्ट प्रकारचे पदार्थ ठेऊ शकतो व चांगल्या प्रकारे नफा कमावू शकतो. आपली उठण्यापासूनची सुरुवात चहाने होत असते.
अशा बऱ्याच पदार्थांमध्ये दूध या पदार्थाचा वापर होत असतो. त्यामुळे तुम्ही दूध डेरी चा व्यवसाय करून चांगल्या प्रकारची कमाई करू शकता.

8) भाजीपाला व्यवसाय.

आज महत्त्वाच्या गरजेतील गरज म्हणजे भाजीपाला होय. त्यामुळे भाजीपाला व्यवसाय करण्यास आपल्याला काही हरकत नाही. अगदी कमी भांडवला पासून आपण भाजीपाला व्यवसाय सुरू करू शकतो. आपण भाजीपाला या व्यवसायाची सुरुवात अगदी हात गाडी पासून ते मोठ्या शॉप पर्यंत चालू करू शकतो.
आपण चांगल्या गर्दीच्या ठिकाणी किंवा एखाद्या बिल्डिंगच्या खाली आपण आपली हात गाडी किंवा एखादा गाळा भाड्याने घेऊन आपण आपला भाजीपाला व्यवसाय याची सुरुवात करू शकतो आणि चांगला नफा मिळू शकतो. त्यासाठी तुम्हाला खूप मोठ्या भांडवलाची गरज नाही.
अगदी कमी पैशापासून आपण हा व्यवसाय चालू करू शकतो. आपण आपल्या जवळील मोठ्या मार्केट मधून अगदी कमी किमतीमध्ये भाजीपाला खरेदी करून, आपण आपल्या हात गाडीवर किंवा दुकानावर त्याची विक्री करून चांगल्या प्रमाणात नफा कमवू शकतो.

9) कुकुट पालन व्यवसाय.

आज आपण जर पाहिलं तर आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. आपल्या भारत देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोक शेती हा व्यवसाय करताना पाहतो पण शेतकऱ्यांना आज-काल त्यांच्या मालाला चांगल्या प्रकारे हमीभाव मिळत नाही.
त्यामुळे शेतकरी कुठेतरी कर्जबाजारी होत आहे त्यामुळे आपण आज शेतकऱ्यांना चांगला जोडधंदा याबद्दल आपण माहिती सांगणार आहोत.
कुक्कुटपालन हा व्यवसाय शेतकऱ्यांना अगदी पूरक ठरणारा व्यवसाय आहे आणि शेतकरी हा व्यवसाय शेतीला जोडधंदा म्हणून करू शकतो कुकूटपालन हा व्यवसाय अगदी कमी पैशांमध्ये आपण उभा करू शकतो तसं जर म्हटलं तर अगदी दहा कोंबड्यांपासून हा व्यवसाय आपण मोठा करू शकतो.
आज भारतामध्ये मोठ्या प्रमाणात नॉनव्हेज खाणाऱ्यांची संख्या आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात नॉनव्हेज गरज भासत आहे. आपण कोंबड्यांपासून मोठ्या प्रमाणात नॉनव्हेज लोकांपर्यंत पोहोचू शकतो.
हा व्यवसाय शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न आणि शेतीसाठी चांगला जोडधंदा ठरू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांना कुक्कुटपालन हा व्यवसाय शेतीला जोडधंदा म्हणून करण्यास काही हरकत नाही.

10) Mobile Shop

मोबाईल हा एक मानवाचा संदेश वाहक म्हणून काम करतो. मोबाईलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपण माहिती ची देवाणघेवाण करू शकतो.
आज जग हे डिजिटल बनत चाललेला आहे त्यामुळे मोबाईल ही एक माणसाची मोठी गरज बनलेली आहे. त्यामुळे आपण मोबाईल रिपेरिंग चा कोर्स करून आपले मोबाईल शॉप हे चालू करू शकतो अगदी कमी भांडवलामध्ये मोबाईलचे दुकान हे आपण खोलू शकतो.
आज-काल शाळेतील मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सर्वांकडे मोबाईल हा असतोच आणि त्यामध्ये काहीतरी बिघाड होतोच तेव्हा मोबाईल रिपेरिंग साठी मोबाईलच्या दुकानातच ग्राहकाला यावं लागतं त्यामुळे मोबाईल रिपेरिंग व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे.
जशी जशी लोकसंख्या वाढत चालली आहे तशी तशी मोबाईलची मागणी ही वाढत चाललेली आहे त्यामुळे आता आणि भविष्यामध्ये मोबाईल बिझनेस हा खूप महत्त्वाचा ठरत आहे आणि ठरणार आहे त्यामुळे मोबाईल रिपेरिंग उद्योगांमधून तुम्ही चांगली कमाई करू शकता.

Also Read:

महिला गृह उद्योग |How to Start Mahila Gruh Udhyog in Marathi

18 फायदेशीर Business ideas in Marathi

व्यवसाय मार्गदर्शन मराठी

conclusion

मित्रानो अशा प्रकारे आपण वरील माहितीचा आढावा घेतलेला आहे. त्यामधील एक व्यवसायाची आपण निवड करून त्यामध्ये यशस्वी व्हा.