18 फायदेशीर Business ideas in Marathi 2023

मित्रांनो, जर तुम्हाला पण business ideas in marathi बद्दल माहिती पाहिजे असेल तर हे आर्टिकल पूर्ण शेवट पर्यंत वाचा. व्यवसाय / उद्योग म्हटलं की खूप जास्त भांडवल आणि जागा पाहिजे हा मोठा गैरसमज बऱ्याच लोकांमध्ये असतो.

Advertisements

उद्योगधंदा करायचाच असेल तर कमी भांडवलात आणि कमी जागेतही करता येऊ शकतो. आपला मराठी माणुस बिज़नस करण्यात कायम मागे राहतो कारण त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. त्यासाठी आम्ही आपल्या मराठी जनतेसाठी घेउन आलो आहोत laghu udhyog ideas in marathi.

Business ideas in Marathi

मित्रांनो COVID-19 च्या साथीमुळे आलेल्या आर्थिक मंदीमुळे बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये gharguti business ideas in marathi अथवा लघु उद्योग करणे हा चांगला पर्याय असू शकतो. लहान घरगुती व्यवसाय सुरू करून तुमच्या मेहनतीच्या जोरावर तुम्ही स्वत:च business empire उभा करू शकता. अशाच काही घरगुती व small business ideas बद्दल खाली माहिती देत आहोत.

1. शेअर बाजार सल्लागार (Share Market Advisor)

मित्रांनो, जर तुमच्याकडे शेअर बाजारातील व्यापार व गुंतवणूकीविषयी ज्ञान व अनुभव असेल तर तुम्ही त्याचा वापर करून small business ideas in marathi सुरू करू शकता. तुम्ही शेअर मार्केटिंगविषयीचे ऑनलाइन प्रशिक्षण वर्गही घेऊ शकता.

स्वत:ची Website तयार करून गुंतवणुकीविषयी सल्ले देऊ शकता. विविध सोशल मीडिया अ‍ॅप्स किंवा Youtube चा वापर करून paid groups बनविण्याचा पर्यायही उपलब्ध आहे. सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करणे कधीही उत्तमच राहील.

ह्या क्षेत्रात खूप जास्त competition आहे. पण तुम्ही तुमच्या Knowledge चा योग्य वापर केल्यास या क्षेत्रात संधीही खूप जास्त आहेत. या व्यवसायाच्या प्रमोशनसाठी Social media अ‍ॅप्सचा वापर करू शकता. तसेच वर्तमानपत्रांसोबत पत्रके वाटूनही जाहीरात करू शकता.

2. डिजिटल पत्रिका (Digital Card)

मित्रांनो, जर तुम्हाला फोटोशॉप व डिजिटल एडिटिंगबद्दल बेसिक ज्ञान व आवड असेल तर त्याचा वापर करून तुम्ही स्वतः चा Business नक्कीच करू शकता. आजकाल विविध कार्यक्रमांचे व समारंभाचे निमंत्रण देण्यासाठी लोक विविध सोशल मीडिया अ‍ॅप्सचा वापर करत आहेत.

त्यामुळे लोकांना विविध कार्यक्रमांसाठी आकर्षक व परिपूर्ण अशा डिजिटल पत्रिकांची आवश्यकता असते. तुम्ही लग्न, बारसे, वाढदिवस, उद्घाटन इत्यादी कार्यक्रम व समारंभासाठी Digital निमंत्रण पत्रिका बनवून देऊ शकता. Image, Video, PDF इत्यादी प्रकारांत या पत्रिका बनविता येतात.ह्या व्यवसायाच्या प्रमोशनसाठी तुम्ही विविध सोशल मीडिया अ‍ॅप्सचा वापर करू शकता.

3. ऑनलाइन अभ्यासक्रम व शिकवणी (Online Classes)

क्लासेस अथवा शिकवणी वर्ग सुरू करायचा असेल तर क्लासरूमची आवश्यकता असते. पण Online Tution तुम्ही घरबसल्या सुरू करू शकता. जर तुम्हाला शिकवण्यामध्ये interest असेल तर ऑनलाइन शिकवणी हा घरगुती बिझनेस साठी चांगला पर्याय असू शकतो.

Lockdown पासून तर  online classes ना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे ऑनलाइन शिकवणी ही एक चांगली घरगुती बिझनेस आयडिया ठरू शकते. अत्यंत कमी भांडवलात तुम्ही ऑनलाइन क्लासेस सुरू करू शकता. त्यासाठी स्वत:चा Laptop अथवा डेस्कटॉप, इंटरनेट कनेक्शन व काही मूलभूत साधने आवश्यक आहेत.

तुमचे ज्या विषयात प्राविण्य आहे अशा पहिलीपासून ते पदवीपर्यंतच्या विविध अभ्यासक्रमांचे online classes घेऊ शकता. त्यासाठी google meetzoom इत्यादी apps चा वापर करू शकता. मार्केटिंग व प्रमोशनसाठी तुम्ही विविध सोशल मीडिया अ‍ॅप्सचा वापर करू शकता.

4. इव्हेंट मॅनेजमेंट (Event Management)

मित्रांनो, जर तुम्हाला सजावट करण्यामध्ये व विविध कार्यक्रमांचे आयोजन व नियाेजन करण्याची आवड असेल तर small business idea in marathi म्हणून तुम्ही या पर्यायाचा विचार करू शकता.

विविध घरगुती व सामाजिक समारंभ व कार्यक्रम व्यवस्थित पार पडावेत अशी लोकांची इच्छा असते. यामध्ये कार्यक्रमांचे निमंत्रण, सजावट, कार्यक्रमाचे व केटरींगचे व्यवस्थापन इत्यादी कामांचा समावेश होतो. गुणवत्तापूर्ण व दर्जेदार सेवा दिल्यास या व्यवसायात खूप जास्त संधी आहेत.

Business ideas marathi

5. होममेड बेकरी व्यवसाय (Homemade Bakery Product)

तुम्हाला जर विविध प्रकारचे केक्स ,कुकीज व बिस्कीट्स बनविता येत असतील तर homemade business idea in marathi म्हणून तुम्ही याचा विचार करू शकता. यासाठी एक चांगल्या ओव्हनची व मूलभूत साधन सामग्रीची आवश्यकता असते.

अत्यंत कमी भांडवलात तुम्ही या व्यवसायाची सुरूवात करू शकता. सध्याचा काळात Ice Cake ची विशेषत: मागणी वाढत आहे. आईस केक सोबतच तुम्ही मागणीप्रमाणे ब्राऊन ब्रेड, आट्टा बिस्कीट अशी आरोग्याला हीतकारक पदार्थांचीही विक्री करू शकता.

6. घरगुती खाद्यपदार्थ (Homemade Food Items)

जर तुम्ही पारंपरिक पाककलेत निपून असाल तर ही तुमच्यासाठी एक चांगली संधी ठरू शकते. आजकाल शहरातील लोकांना वेळ किंवा जागेअभावी उन्हाळी पदार्थ, लोणची इत्यादी बनविता येत नाहीत.

तुम्ही order प्रमाणे विविध उन्हाळी पदार्थ (वेफर्स, कुरूड्या, पापड इत्यादी),  लोणची, विविध प्रकारच्या चटण्या बनवून देऊ शकता. गरोदर स्त्रिया व लहान मुलांसाठी मागणीप्रमाणे पौष्टिक पदार्थ ही बनवून देता येतील. आपल्या मराठी लोकांना खायला खुप आवडते त्यामुळ ह्या व्यवसायात तुम्हाला फायदा नक्की होइल.

7. डान्स क्लासेस (Dance Classes)

मित्रांनो, जसे की आपल्याला माहित आहे की नृत्य अथवा Dance हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. चित्रकला, Photography, गायन, वादन, लिखाण यांसारखेच नृत्य केवळ एक छंद म्हणून न जोपासता व्यावसायिक क्षेत्र म्हणूनही निवडता येऊ शकते. हे क्षेत्र एक चांगली घरगुती उद्याेग आयडिया ठरू शकते.

यासाठी मोकळी जागा (dance floor) उपलब्ध असणे आवश्यक आहे. तुम्ही या कलेत निपून असाल तर online dance classes ही घेऊ शकता.  नृत्यकलेत पारंगत असल्यास लग्न व विविध समारंभांसाठी Choreography ही करू शकता. आणि भरपूर पैसे ही कमवू शकता.

8. घर ऑटोमेशन (Home Automation)

होम ऑटोमेशन हे भारतीय बाजारपेठेत नवीन असले तरी या क्षेत्रात येणाऱ्या काळात खूप जास्त संधी आहेत. यासाठी मूलभूत तंत्रज्ञान ज्ञात असणे आवश्यक आहे. Engineers साठी ही एक चांगली business idea ठरू शकते.

स्मार्ट बल्ब, स्मार्ट स्विच, सीसीटीव्ही इत्यादींचा वापर करून तुम्ही साधं घर स्मार्ट होम मध्ये बदलून देऊ शकता. अत्यंत कमी भांडवलात तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता.आणि ह्या व्यवसायात पैसे भी भरपूर मिळतात.

9. मिनी कॅफे (Mini Cafe)

Mini Cafe हा कमी जागेत आणि भांडवलात सुरू होऊ शकनारा एक उत्तम बिज़नस आहे. यामार्फत विविध प्रकारचे चहा, कॉफी उन्हाळ्यात विविध प्रकारचे सरबत विक्रीस ठेवता येतील.

यामध्ये चहा व कॉफीची चव, गुणवत्ता व दर्जा कायम राहणे गरजेचे आहे. तसेच या उद्याेगाची जागा ही मोक्याच्या ठिकाणी असणेही महत्त्वाचे आहे. यासाठी food van चाही वापर केला जाऊ शकतो.

10. घरगुती हस्तकला (Homemade Handicraft)

हस्तकला हा कलेचा पारंपरिक भाग आहे. यामध्ये विणकाम, सुईकाम, जरीकाम, शिवणकाम, बाहुल्या बनविणे, कोरीवकाम, नक्षीकाम यांसारख्या कामांचा समावेश होतो. भारत हस्तकलेसाठी प्रसिद्ध आहे.

जर तुम्ही हस्तकलेत पारंगत असाल तर तुम्ही हस्तकलेचा एक बिज़नस म्हणून विचार करू शकता. तुम्ही तुमच्या हस्तकलेतील कौशल्याचा वापर करून मागणीप्रमाणे बाहुल्या, विविध शोभेच्या व कलाकुसरीच्या वस्तू, हस्तनिर्मित ग्रीटिंग्स् (handmade greetings) इत्यादी बनवून देऊ शकता.

11. फळे व भाजी विक्री केंद्र (Fruit & Vegetable Store)

फळे व भाज्या या मानवी आहाराचा अविभाज्य घटक आहेत. Lockdown पासून या व्यवसायास विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. घरगुती बिझनेस आयडिया किंवा लघु उद्योग आयडिया म्हणून तुम्ही या व्यवसायाचा विचार करू शकता.

तुम्ही होलसेल दराने निवडक व चांगल्या मालाची खरेदी करून योग्य दरात घरातूनच विक्री करू शकता. सोशल मेडियाचा वापर करून तुम्ही घरपोच सेवाही देऊ शकता. जर तुमच्याकडे एखादे लहान वाहन जसे की छोटा टेम्पो असेल, तर तुम्ही त्याचा वापर करून फिरते फळे व भाजी विक्री केंद्रही सुरू करू शकता.

12. मिनी ट्रान्सपोर्ट सेवा (Mini Transport Service)

जर तुमच्याकडे अवजड वाहन चालविण्याचा परवाना व अनुभव असेल तर तुम्ही या व्यवसायाचा विचार करू शकता. तुम्ही स्थानिक पातळीवर मालाची वाहतूक करू शकता. तुम्हाला वाहन खरेदीसाठी बँकांकडून व फायनान्स कंपन्यांकडून कर्जही मिळू शकते. ह्या व्यवसायातून तुम्ही चांगले पैसे कमवू शकता.

13. मिनी डाळ मिल (Mini Dal Mill)

आजकाल दुकानात उपलब्ध असणारी डाळ ही पॉलिश केलेली असते, अशी बऱ्याच लोकांची तक्रार असते. त्यामुळे नैसर्गिक व केमिकल विरहीत पद्धतीने डाळ बनविल्यास या व्यवसायात खूप संधी आहेत.

घरात असलेल्या पारंपरिक जात्याचा वापर करूनही तुम्ही ह्या उद्योगाची सुरूवात करू शकता. तुमच्याकडे थोडीशी जागा आणि भांडवल उपलब्ध असल्यास मशिनरीचा वापर करून तुम्ही मिनी डाळ मिल सुरू करू शकता.

14. मिनी ऑईल मिल (Mini Oil Mill)

जर तुमच्या भागात तेलबियांचे उत्पादन विपुल प्रमाणात घेतले जात असेल, तर तुम्ही मिनी ऑईल मिलचा उद्योग करू शकता. तुम्ही साध्या ईलेक्ट्रिक तेलाच्या घाण्यापासून या व्यवसायाची सुरूवात करू शकता.

स्वतंत्र जागा उपलब्ध नसल्यास घरात उपलब्ध असलेल्या मोकळ्या जागेतही हा व्यवसाय सुरू करता येतो. त्यामुळे ही एक घरगुती बिझनेस आयडिया ठरू शकते. पण स्टीमचा वापर न करता तयार केलेले तेल जास्त दिवस टिकत नाही.

दोन महिन्यांत त्याची गुणवत्ता ढासळण्यास सुरूवात होते. त्यामुळे स्वतंत्र जागा उपलब्ध असल्यास अत्याधुनिक स्वयंचलित ऑईल मिल संच विकत घेणे उपयुक्त ठरेल. यासाठी शासनाकडून अनुदानही मिळू शकते. Mini Oil mill तुम्ही online ऑर्डर करू शकता.

15. कृषी/ शेती सल्लागार (Agricultural/ Farm Advisor)

आजकाल बोगस व स्वंयंघोषित शेती व कृषी सल्लागारांचा सुळसुळाट वाढलेला आहे. चूकीच्या व बोगस सल्ल्यांमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे.जर तुम्ही कृषी पदवीधर असाल तर हे क्षेत्र बिज़नस म्हणून विचारात घेऊ शकता.

तुम्ही कृषी विद्यापीठे, विविध संशोधन केंद्रे व शेतकरी यांमधील दुवा ठरू शकता. तुमच्या ज्ञानाचा व तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांना योग्य तो सल्ला देऊ शकता. शासनाच्या विविध योजनांची माहीती शेतकऱ्यांपर्यंत पोहचवू शकता.

16. किराणा दुकान (Grossery Shop)

मित्रांनो, ज्या व्यवसायाला मरण नाही असा व्यवसाय म्हणजे किराणा मालाचे दुकान. अत्यंत कमी जागेत आणि भांडवलात सुरू होऊ शकणारा हा व्यवसाय आहे. जर स्वतंत्र जागेचा अभाव असेल तर तुम्ही घरी पण हा धंधा करू शकता.

तुम्ही निवडक व गुणवत्तापूर्ण मालासह घरातूनही ह्या व्यवसायची सुरूवात करू शकता. यामध्ये सर्वात महत्वाचा भाग जाहिरात जो व्यवसायाचा आविभाज्य घटक आहे. या व्यवसायाच्या मार्केटिंगसाठी तुम्ही सोशल मीडिया अ‍ॅप्सचा वापर करू शकता. या उद्योगात तुम्ही मालाची घरपोच सेवाही देऊ शकता. मालाची ऑर्डर घेण्यासाठी तुम्ही सोशल मीडिया अ‍ॅप्सचा वापर करू शकता.

17. कृषी प्रक्रिया उद्योग (Agricultural  Processing Industries)

मित्रांनो, जर तुम्ही शेती करत असाल तर तुमच्या साठी ही एक खुप चांगली business आईडिया आहे. कारण शेती सोबत तुम्ही कृषि प्रक्रिया उद्योग शुरू करू शकता. आपल्याला माहिती आहे की बराच शेतमाल हा नाशवंत (perishable) असतो.

त्यामुळे बऱ्याचदा भाव पडलेला असतानाही शेतकऱ्यांना नाईलाजास्तव विक्री करावी लागते. अशा या नाशवंत (perishable) कृषीमालाची निर्जलीकरण (dehydration), pulping इत्यादी तंत्रज्ञानाचा वापर करून साठवणूक करता येते व पुढे त्याची प्रक्रिया उद्योगातील कच्चा माल म्हणून विक्री करता येते.

जर तुम्ही Agriculture Engineer किंवा अन्न तंत्रज्ञान पदवीधर असाल तर या क्षेत्राचा लघु उद्योग आयडिया म्हणून नक्कीच विचार करू शकता. अन्न प्रक्रिया उद्याेगा अंतर्गत तुम्ही जॅम, जेली, सॉस, केचअप इत्यादी पदार्थाचे उत्पादन करू शकता. फळांचे निर्जलीकरण (dehydration) करून त्यांची विक्री करू शकता. Agricultural Processing Industries उभारून तुम्ही खूप चांगले पैसे कमावू शकता.

18. दूध संकलन केंद्र (Milk Collection Centre)

जर तुमच्या भागात दुग्धउत्पादन हे विपुल प्रमाणात असेल तर एक चांगला बिज़नस म्हणून तुम्ही दूध संकलन केंद्राचा विचार करू शकता. एखाद्या दूध उत्पादक संघाच्या सहाय्याने तुम्ही दूध संकलन केंद्राची सुरूवात करू शकता.

यासाठी जास्त भांडवल किंवा जागेची आवश्यकता नाही. बऱ्याच शेतकऱ्यांना दरवेळी दूध संकलन केंद्रात येऊन दूध देणे शक्य नसते. अशा शेतकऱ्यांसाठी तुम्ही टू व्हीलर चा वापर करून घरोघरी जाऊनही दूधाचे संकलन करू शकता.

दूध हे आपल्याला रोजच्या life मध्ये खुप गरजेचे असते. त्यामुले जर तुम्ही Milk Collection centre चालू केले तर तुम्हाला याच्या तुन कायम फायदाच होइल.

टीप: लॉकडाऊनच्या कालावधीत बरेच लोक शेती व उद्योगधंद्यांकडे वळले. पण त्यांतील कित्येक उद्योगधंदे बंदही पडले. अपुरे ज्ञान व अनुभवाचा अभाव ही त्यामागील प्रमुख कारणे आहेत. उद्योगधंदा सुरू करण्याबरोबरच तो टिकून रहाणं ही तितकंच महत्त्वाच आहे.

त्यामुळे कोणताही उद्याेग सुरू करण्याआधी त्याविषयी परिपूर्ण माहिती घेणे फायदेशीर आहे. तसेच उद्योग सुरू करण्याआधी त्या क्षेत्रातील प्रशिक्षण अथवा अनुभव घेणे उपयुक्त ठरेल. तसेच कोणताही उद्योग सुरू करताना कायदेशीर बाबींची पूर्तता करणे हिताचे राहील.

जाहीरात अथवा मार्केटिंग हा कोणत्याही उद्योगधंद्याचा अविभाज्य व सर्वांत महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे प्रमोशनसाठी सोशल मीडिया अ‍ॅप्सचा वापर करणे फायदेशीर ठरेल.

Conclusion:

तर मित्रांनो, तुम्हाला आमची पोस्ट business ideas in marathi चांगली आणि माहितीची वाटली असेल तर ह्या पोस्ट ला आपल्या मित्रांबरोबर नक्की शेयर करा.

धन्यवाद!

Also Read,

Leave a Comment

WhatsApp