Online घर बसल्या Job करा आणि Rs.2500 रोज पैसे कमवा 2024

मित्रांनो, आज काल सर्वांनाच ghar baslya job हवा आहे. अलीकडच्या दिवसात Internet खुपच स्वत झाल आहे आणि जवळ जवळ सगळ्या कडेच Smartphone आणि Laptop अवेलेबल आहे. त्यामुळ बरेच लोग घर बसल्या जॉब करत आहे.

Advertisements

मित्रांनो, अगदी छोटा बिझनेस अथवा घरगुती व्यवसाय करायचं म्हंटल तरी थोड्या प्रमाणात का होईना पण भांडवल लागतेच. त्यात यश मिळेल की नाही ही भीतीही असते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे व्यवसायात प्रत्येकाला आवड असेलच असे नाही.

काही जणांना कोणाच्याही दबावाखाली काम करायला आवडत नसते. त्यांना स्वतंत्रपणे काम करण्याची इच्छा असते. कोणतेही भांडवल न गुंतवता असे स्वतंत्रपणे काम करणे शक्य आहे का? त्यासाठी कोणते पर्याय असू शकतात व तुम्ही कोणकोणत्या क्षेत्रात काम करू शकता?

त्यासाठी कोणत्या साधनांची व उपकरणांची आवश्यकता आहे काय? त्यासाठी काही Educational Qualification व Coarse ची गरज लागते का? तसेच यासाठी कोणती काळजी घ्यावी? इत्यादी प्रश्नांची उत्तरे हवी असल्यास व  gharghuti kam pahije असल्यास पूर्ण लेख वाचा. तसेच विद्यार्थी, गृहिणी व पार्ट टाईम जॉब हवा असणाऱ्या लोकांसाठीही हा लेख उपयुक्त ठरू शकतो.

घर बसल्या Job

प्रत्येकाला काही ना काही छंद असतोच. काही जणांना चित्र काढण्याचा तर काही जणांना भ्रमंती करण्याचा. काही लोकांना त्यांच्या आवडीच्या विषयावर लिहण्याची आवड अथवा छंद असतो.

Photography, चित्रकला, लिखाण, Dance इत्यादी छंद जोपासत त्यापासून पैसे कमवू शकता का? तर उत्तर आहे – होय, तुम्ही तुमचा छंद जोपासतही पैसे कमवू शकता. तुमच्या मनात प्रश्न पडेल की, कसं शक्य आहे ते? तुम्ही तुमच्या आवडीच्या क्षेत्रात Freelancer म्हणून काम करू शकता.

‘फ्रीलान्सर’ या शब्दाचा शब्दश: अर्थ स्वतंत्ररीत्या काम करणारा असा आहे. फ्रीलान्सर म्हणून काम करण्याची संधी देणारे अनेक ऑनलाइन प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. अशा काही प्रमुख फ्रीलान्सर Online Platforms ची नावे खाली देत आहोत:

स्वतंत्ररीत्या काम करता येईल अशा काही प्रमुख क्षेत्रातील संधींविषयी खाली माहिती देत आहोत:

1. Content Writer

Content अथवा माहिती हा आजच्या डिजिटल जगातील खूप महत्त्वपूर्ण घटक आहे. जर तुम्हाला लिखाण करण्याची आवड असेल व त्यातून तुम्हाला पैसे कमवायचे असतील तर तुम्ही या क्षेत्राची निवड करू शकता.

कामाच्या पहिल्या दिवसापासून तुम्हाला कमाईची आवश्यकता असेल, तर हे क्षेत्र तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. तुम्ही स्वत:चा blog ही तयार करू शकता. पण त्यातून कमाई सुरू होण्यास थोडा वेळ लागू शकतो. यासाठी तुम्ही चांगल्या 2-3 फ्रीलान्सर वेबसाईटस् वर अकाऊंट काढावे लागेल. ती नोंदणी प्रक्रिया बऱ्याच Websites वर निशु:ल्कच आहे.

त्या वेबसाईटस् वर स्वत:ची Profile व्यवस्थित तयार करणे, त्यात तुमच्या Sample Work किंवा डेमोचा समावेश करणे आवश्यक आहे. कारण त्याच आधारावर तुम्हाला काम मिळनार आहे. तसेच तुम्ही तुमच्या आवडीच्या व तुम्ही निपुण असाल अशा क्षेत्राचीच निवड करणे आवश्यक आहे.

विविध Content Writer यासाठी साधारणत: 10 पैसे ते 4 रूपये प्रति शब्द प्रमाणे शुल्क आकारतात. लिखाण हे स्वत:च्या शब्दात असावे. ते copy-paste असू नये. अन्यथा या क्षेत्रात तुमचे करीअर सुरू होण्याआधीच संपू शकते.

आजकालच्या Digital युगात या क्षेत्रात खुप जास्त संधी आहेत. पर्यटण, पर्यावरण, इतिहास इत्यादी क्षेत्रातील विविध वेबसाईटस् किंवा Blogs साठी तुम्ही content लिहू शकता. उदाहरणार्थ, लॉकडाऊनच्या काळात Online क्लासेसचे महत्त्व वाढले आहे.

अशा विविध क्लासेसना बऱ्याचदा नोटस् बनविण्यासाठी कंटेंट रायटर्सची आवश्यकता असते. क्लासेस त्यांच्या वेबसाईटस् वर यासंबंधित जाहीरात देतात. तुम्हाला Notes बनविता येत असतील तर तुम्ही अशा जाहिरातींसाठी अर्ज करू शकता.

अशा Online Classes प्रमाणेच तुम्ही तुमच्या आवडीच्या क्षेत्रातील (पर्यटण, पर्यावरण इत्यादी) वेबसाईटस् किंवा ब्लॉग वर जाहिरात पाहू शकता व ऑनलाइन अर्जही करू शकता. अशा प्रकारे ghar baslya likhan kam करून तुम्ही पैसे कमवू शकता.

तसेच बऱ्याच मोठमोठ्या कंपन्याच्या वेबसाईटस्, blog व अन्य लहानमोठ्या वेबसाईट्सना इंग्रजी कंटेंटचा मराठी व अन्य भाषांमध्ये translation करून हवा असतो. तुमचे इंग्रजीसोबतच अन्य कोणत्याही दोन तीन भाषांवर प्रभुत्त्व असल्यास तुम्ही अनुवाद करण्याचेही काम करू शकता.

2. Video or Photos Editing

मित्रांनो, तुम्हाला Video किंवा Photo Editing जमत असेल व त्यात तुम्हाला आवड असेल तर या क्षेत्रात तुम्हाला खूप संधी आहेत. जर तुम्हाला Photography चांगल्या प्रकारे येत असेल तर विविध Websites किंवा Blog साठी त्यांच्या मागणीप्रमाणे Photos काढून व Editing करून देऊ शकता.

काही पर्यटण क्षेत्रातील कंपन्यांना किंवा Bloggers ना काही पर्यटण व Historical places चे फोटो हवे असतात. जर तुम्ही बाईक रायडर असाल किंवा तुम्ही वरचेवर गड /किल्ले व अन्य प्रेक्षणीय स्थळांना भेट देत असाल, तर ही तुमच्यासाठी एक चांगली संधी ठरू शकते.

तुम्ही अशा पर्यटण क्षेत्रातील विविध कंपन्या व ब्लॉग साठी फ्रीलान्सर म्हणून काम करू शकता. यासाठी फ्रीलान्सर वेबसाईटस् वर तुमची प्रोफाईल व्यवस्थित तयार करणे व प्रोफाईलमध्ये तुमच्या कामातील उत्कृष्ट नमुन्यांचे सादरीकरण आवश्यक आहे.

समारंभ किंवा कार्यक्रमाचे फोटोशूट करणाऱ्या फोटोग्राफर्सना Video and Photo Editing साठी बऱ्याचदा मदतीची आवश्यकता असते. जर तुम्हाला फोटोस व इडीटींग मध्ये आवड असेल, तर तुमच्या ओळखीच्या किंवा आसपासच्या फोटोग्राफर्सशी संपर्क करून तुम्ही या क्षेत्रातील संधी जाणून घऊ शकता व त्यांच्यासाठी Freelancer म्हणून काम करू शकता.

3. Power Point Presentation Designer

Power Point Presentation आजच्या Digital युगातील सादरीकरणातील महत्त्वपूर्ण घटक आहे. बऱ्याच कंपन्यांना  Professional पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन बनवून हवे असतात. तुम्हाला जर Computer चे मूलभूत ज्ञान असेल व तुम्ही प्रोफेशनल Power Point Presentation बनवू शकत असाल, तर तुम्ही PPT तयार करून पैसे कमवू शकता.

यासाठी कोणतीही विशेष अशी Educational qualifications लागत नाही. प्रोफेशनल पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन डिझायनर होण्यासाठी English भाषेवर प्रभुत्व गरजेचे आहे. तसेच MS Office चे ओरिजिनल genuine व्हर्जन असणे गरजेचे आहे. Crack केलेले व्हर्जन वापरण्यास परवानगी नाही.

या क्षेत्रात ‘Knowmore‘ हा एक विश्वसनीय प्लॅटफॉर्मस् पैकी एक आहे. त्या प्लॅटफॉर्म वर ऑनलाईन अर्ज करून तुम्हाला तीन चाचणी परीक्षा द्यावा लागतात. तुम्ही त्या परीक्षा पास झाला की तुमची प्रोफेशनल पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन डिझायनर म्हणून निवड होते.

त्या platform वर टिकून राहण्यासाठी आठवड्यात किमान 10 तास काम करणे गरजेचे आहे. त्याबद्दल तुम्ही इंटरनेटवरून अधिक माहिती घेऊ शकता.ऑनलाइन क्लासेसनाही पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तयार करून हवी असते.

जर तुम्हाला Education क्षेत्रात काम करण्याची इच्छा असेल तर अशा ऑनलाइन क्लासेसना त्यांच्या मागणीप्रमाणे तुम्ही पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन बनवून देऊ शकता. त्याच्याशी संबंधित Advertisement विविध क्लासेसच्या वेबसाईट वर वेळोवेळी प्रसिद्ध होत असतात. तुम्ही त्या जाहीरीतींच्या संदर्भाने ऑनलाइन अर्ज करू शकता.

4. Data Entry Operator

आजकाल जवळजवळ सर्वच कंपन्याचा त्यांचे कामकाज डिजीटल करण्याकडे कल वाढला आहे. तसेच लहान मोठ्या व्यापाऱ्यानी त्यांचा हिशोब व Biling हे Computer वर करण्यास सुरूवात केलेली आहे. त्यामुळे या क्षेत्रात दिवसेंदिवस अधिकाधिक संधी उपलब्ध होत आहेत.

Text किंवा Image Format मधील माहिती एखाद्या विशिष्ट Software मध्ये एकत्र करण्याच्या प्रक्रियेस ‘Data Entry’ असे म्हणतात. डेटा एंट्रीमध्ये एक्सेल डेटा एंट्री, Spelling Checker, पेपर डाक्युमेंटेशन, जॉब पोस्टिंग, Data Conversion इत्यादी प्रकारांचा समावेश होतो.

डेटा एंट्री ऑपरेटर बनण्यासाठी इंग्रजी भाषेचे मूलभूत ज्ञान व Typing Speed चे कौशल्य असणे आवश्यक आहे. तसेच या कामासाठी संगणकाचे मूलभूत ज्ञान व MS Office विशेषत: MS Word व MS-Excel वापरता येणे गरजेचे आहे. हे काम घरबसल्या करूनही तुम्ही पैसे कमवू शकता.

गृहिणी, विद्यार्थी असल्यास अथवा अन्य ठिकाणी जॉब करत असल्यास तुम्ही हे काम पार्ट टाईम जॉब म्हणून करू शकता. फुल टाईम डेटा एंट्री ऑपरेटर म्हणून करीअर करायचे असल्यासही या क्षेत्रात चांगला स्कोप आहे. हा एक खूप चांगला gharghuti kam in marathi आहे.

5. Graphic Designer

Graphic Designer ही विचार व अनुभवांना visuals च्या माध्यमातून दाखवायची एक कला आहे. यामध्ये Visuals व Text दोन्हींचा समावेश असतो.

ग्राफिक डिझाईनरलाच ‘visual communicator’ असेही म्हणतात. जे विज्युअल कंसेप्ट्स बनविण्यासाठी हस्तकलेचा किंवा विविध Computer Software चा वापर करतात.

ग्राफिक डिझायनर हे शब्द, फोटो, आयकॉन इत्यादींचा वापर करून Design तयार करतात. ते आपल्या डिझाईनच्या माध्यमातून माहिती किंवा विचार लोकांपर्यंत पोहचवतात. आजच्या Digital Media च्या युगात ग्राफिक डिझाईनचे महत्त्व वाढलेले आहे.

त्यामुळे या क्षेत्रात भरपूर संधी उपलब्ध होऊ शकतात. जर तुम्हाला या क्षेत्रात करीअर घडविण्याची इच्छा असेल तर तुमच्याकडे काही विशिष्ट कौशल्ये असणे गरजेचे आहे. त्यामध्ये Creativity, Software Knowledge, वेळेचे व्यवस्थापन, Visualisation, चांगले संवाद कौशल्य म्हणजेच Good Communication Skill इत्यादी कौशल्यांचा समावेश होतो.

तसेच या क्षेत्रात करीअर करायचे असल्यास कौशल्ये वाढविण्यासाठी तुमच्या कमकुवत बाजू ओळखूण त्या मजबुत करण्यासाठी प्रशिक्षण घेणे उपयुक्त ठरेल.

घरगुती Online काम करण्यासाठी काही विशेष Instruments व Gadgets ची आवश्यकता असते का?

आजकाल बरीच कामे तुम्ही Mobile फोनवर करू शकता. Content Writing साठी तुम्ही मोबाईलचा वापर केलात तरी चालू शकते. पण Software अधारीत कामांसाठी जसे की Photo and Video Editing, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन, ग्राफिक डिझायनिंग, Data Entry इत्यादींसाठी Computer चाच वापर करणे फायदेशीर राहील. घरी बसून काम करण्यासाठी तुम्हाला Mobile, Laptop आणि चांगले Internet Connection ची गरज लागते.

घरी बसून काम करण्यासाठी काही Education किंवा Coarse करावा लागतो का ?

Gharghuti Job Marathi शी संबंधित वरील article मध्ये सांगितलेल्या बहुतेक क्षेत्रांत काम करण्यासाठी विशिष्ट अशा Educational qualifications ची आवश्यकता नाही. आणि कोणत्याही प्रकारचा Coarse करण्याची ही काही गरज नसते पण त्या क्षेत्रांतील विशिष्ट कौशल्ये आत्मसात असणे फायद्याचे राहील. Power Point Presentation Designer म्हणून काम करण्यासाठी English Language वर प्रभुत्व असणे आवश्यक आहे.

घरी बसून काम शोधताना कोणती काळजी घ्यावी?

News paper किंवा सार्वजनिक ठिकाणी घर बसल्या काम करा आणि भरपूर पैसे मिळवा अशा आशयाच्या जाहीराती पाहायला मिळतात. यांतील काही जाहीराती या फसव्या किंवा दिशाभूल करणाऱ्या असतात. कोणतंही काम शोधताना आपण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की, यशाला कधीच Short cut नसतो.

अशा जाहीरात देणाऱ्या कंपन्या काम देण्याआधी नोंदणीचा व Training च्या नावाखाली शुल्क आकारतात. नंतर अशक्यप्राय असे काम दिले जाते व अप्रत्यक्षपणे फसवणूक केली जाते. त्यातील काही कंपन्या व एजन्सीज चांगल्या असतीलही. पण स्वत:ची फसवणूक होऊ नये असे तुम्हाला वाटत असल्यास अशा गोष्टींची शहानिशा करणे हितकारक ठरेल.

Online Websites वर Freelancer म्हणून काम करण्यास सुरूवात करणार असाल तर शक्यतो विश्वसनीय अशा वेबसाईटस् वरच नोंदणी करावी. नवीन वेबसाईट असल्यास प्रथम शहानिशा करणे फायद्याचे राहील. तसेच तुम्ही ज्या कामाची निवड करताय ते काम कायदेशीर आहे का? हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Conclusion:

मित्रांनो, ghar baslya job शी संबंधित वरील माहिती जर तुम्हांला आवडली असेल तर ह्या post ला जास्तीत जास्त शेयर नक्की करा.

Also Read:

7 thoughts on “Online घर बसल्या Job करा आणि Rs.2500 रोज पैसे कमवा 2024”

Leave a Comment

WhatsApp