Homemade Business ideas in Marathi। घरी करता येणारे व्यवसाय 2023

Friends, आज आपण homemade business ideas in marathi म्हणजेच घर बसल्या करता येणारे business बद्दल माहिती घेणार आहोत.

तर friends, आज covid मुळे जी काही अप्रत्याशीत परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामधून आपल्याला खूप काही शिकायला मिळालं आहे. जवळ जवळ सात आठ महिने आपण घरात राहुन काढलेले आहेत.

काही लोकांना ह्या काळात काहीही त्रास झाला नाही तर, खुपश्या लोकांनी अगदी वाईट परिस्थितीत दिवस काढले आहेत. काही लोकांना business मध्ये जोरदार फटका बसला आहे तर खुप लोकांच्या jobs सुद्धा गेलेला आहे.

So friends, हा विचार मनात राहु द्या की ही असली परिस्थिती पुन्हा सुद्धा उद्भवू शकते. तर तुम्हाला देवाने, covid च्या रुपात जणू एक संधीच दिली आहे कि आपल्याला शिकायला पाहिजे की अश्या विषम परिस्थितीत कसं जगायचं. कारण covid मुळे आपल्याला अतिरिक्त पैसा आणि savings ह्या दोघांचे महत्व चांगलेच कळाले आहे.

Homemade business ideas in marathi

आजची ही परिस्थिती पाहता, महिलांनी सुद्धा आता एक पाऊल पुढे टाकायला हवं आणि घरातील खर्चात थोडा फार का होईना, पण सहयोग द्यायला पाहिजे.

आणि मुख्य म्हणजे, त्यासाठी तुम्हाला घराबाहेर पडायलाच पाहिजे असं सुद्धा नाही आहे. जर का तुम्हाला घरा बाहेर पडुन job करणं शक्य नसेल तर तुम्ही घरबसल्या सुद्धा homebase business करु शकतात आणि ते ही, तुमच्या हातात कोणतीही मोठी degree नसताना ही.

तर मग चला friends, पाहूया घरबसल्या तुम्हाला करता येणारे काही homemade business ideas in marathi.

1. Cooking

मित्रांनो, तुमचा interest जर नवनवीन recipes try करण्यात असेल, cooking तुमची hobby असेल आणी तुम्ही जास्तं लोकांचा चविष्ट स्वयंपाक बनवु शकतात तर तुम्हाला तुमची ही hobby एक business opportunity सुद्धा उपलब्ध करुन देऊ शकते.

Cooking field मध्ये तुम्ही, bakery products, chocolate, homemade मसाले, पापड, लोणची, jam, jelly, फराळाचे पदार्थ, साठवणीचे पदार्थ, शिवाय रोजच्या जेवणाचे डबे किंवा छोटंसं घरगुती खानावळ इत्यादी खुप काही करुन आपला business start करु शकतात.

2. Reselling

Friends, तुम्ही Reselling म्हणजेच वस्तु विकुन सुद्धा भरपूर पैसे कमावू शकतात. तुम्ही Artificial jewellery, साड्या, dresses, different type आणि materials चे bags, beauty products आणि इतर खुपशा रोज कामात येणार्या वस्तुंचे reselling करून सुद्धा घरबसल्या पैसे कमवू शकतात.

3. Beauty parlour आणि मेहंदी

मैत्रिणींनो, आज makeup आणि beauty products चं market इतकं मोठं झालं आहे तुम्हाला कल्पना सुद्धा नसेल. पूर्वी लग्नात फक्त नवरी मुलगीच पार्लर मध्ये जाऊन तैयार व्हायची पण आज लग्नात प्रत्येक झण beauty parlour मध्ये जाऊन तैयार होतं.

आज ह्या field मध्ये सुद्धा नवनवीन experiments होत आहेत आणि खुप Opportunities सुद्धा आहेत.

तर तुम्ही योग्य training घेऊन, घरातल्या घरात स्वतः चं एक छोटंसं  beauty parlour नक्कीच उघडू शकता. तसेच आजकाल प्रत्येक function मध्ये मेहंदी लावायचं trend आहे.तर तुम्हाला ह्यात सुद्धा पैसे कमवता येतील

4. विविध वस्तु बनवून आणि विकून

मित्रांनो, तुम्ही योग्य प्रशिक्षण घेऊन घरातल्या घरात soap, candle, अगरबत्ती, Jewellery, sweater, soft toys इत्यादि वस्तु बनवुन सुद्धा विकु शकतात.

सिलाई येत असेल तर स्वतः चं boutique सुद्धा उभं करु शकतात. ह्या करता तुम्हाला जास्तं investment किंवा machinery ची गरज नाही आहे.

5. Classes किंवा Center

तुम्ही Yoga, gym, dance, music चे classes घेऊ शकतात, शिवाय Day care center सुद्धा सुरू करु शकतात. जिथं तुम्ही नोकरी करणार्या पालकांच्या मुलांना ठेऊ शकतात.

जर तुम्हाला एखाद्या विषयाचं भरपूर आणि योग्य ज्ञान असेल तर, तुम्ही स्वतः चं tution center सुद्धा सुरू करु शकतात.

6. Financial Advisor

मित्रांनो, जर तुम्ही शिकलेले आहात आणि तुम्हाला finance field मध्ये थोडं फार knowledge असेल तर तुम्ही Financial advisor किंवा  Businesses development executive सुद्धा बनू शकतात.

Financial advisor च काम, लोकांना त्यांच्या money matters, जसं investment, savings, खर्च इत्यादी मध्ये योग्य advice देऊन मदद करायचं आहे.

तर business development executive, companies चं business develope करण्यासाठी new clients आणायला मदद करतात.

Also Read,

Ghari Basun Packing kam 2023

7. Digital marketing आणि Affiliate marketing

मित्रांनो, आज या दोन्ही क्षेत्रात आज खुप Opportunities आहेत. पण तुम्हाला ह्या दोघाही क्षेत्रात काम करायचं असेल तर, तुम्हाला थोडं फार प्रशिक्षण घ्यावच लागेल.

त्याशिवाय तुम्हाला computer चं knowledge असन सुद्धा must आहे. पण एकदा काय training घेतलं की तुम्ही तुमच्या स्वतः ची company उघडुन, घरी बसल्या कामं करु शकतात.

तुम्ही स्वतः ची Digital marketing agency सुरु करू शकतात. Affiliate Marketing तुम्ही घर बसल्या करू शकतात आणि खुप पैसे कमावू शकतात.

8. Form filing and data entry

आजकाल खुपशा companies, data entry आणि form filing चं काम देतात, आणि ते काम घरी बसल्या सुद्धा होऊ शकतं.

फक्त तुमच्या कडे computer किंव्हा laptop असणं गरजेचं आहे. त्याच बरोबर तुम्हाला Internet ची सुद्धा गरज लागेल.

9. Freelance content writer

Friends, आज content writing ह्या क्षेत्रात सुद्धा भरपूर कामं available आहेत. जर तुम्हाला लिखाण करायला आवडतं आणि तुम्ही लोकांना आवडेल असं content उत्तम प्रकारे लिहु शकता तर तुम्ही content writing हे क्षेत्र निवडू शकतात.

ह्या क्षेत्रात तुम्ही घरी बसल्या सुद्धा काम करु शकतात.ऑनलाइनच्या ह्या काळात, Facebook, Instagram, सारख्या खुपशा social sights आहे जिथुन तुम्हाला content writing चं काम मिळु शकतं.

10. Youtube videos

Friends, तुम्ही जे Youtube उघडुन, रोज  videos पाहून नवनवीन गोष्टी शिकतात, तर तुम्हाला माहिती नसेल पण तुम्ही ज्यांचे video पाहतात त्यांना त्याचे पैसे मिळतात.

तर तुमच्यात जर का काही मास्टरी किंवा Talent असेल तर तुम्ही सुद्धा तुमचे Youtube videos बनवून पैसे कमवू शकतात.

Conclusion:

मित्रांनो, हे तर काही क्षेत्र आहेत, ज्या मध्ये तुम्ही, कमीतकमी गुंतवणूक करुन, कमीतकमी भांडवल घेऊन आणि कमीतकमी Machinery वापरून घरबसल्या स्वतः चं homebase business उभा करु शकतात.

असे आणखी ही अनेक क्षेत्र आहेत. तुम्ही तुमच्या आवडी आणि सुविधानुसार क्षेत्र निवडा आणि स्वतः चं  homemade business सुरू करा.

आजकाल सरकार सुद्धा महिलांना खुप प्रोत्साहन देत आहे. तुम्ही सरकारचा सहयोग, मार्गदर्शन आणि त्यांच्या द्वारे महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी राबवल्या जात असलेल्या विभिन्न योजनांचा उपयोग करून स्वतः चं आणि आपल्या कुटुंबाचं भविष्य उज्ज्वल करु शकता.

मित्रांनो तुम्हाला जर आमची ही पोस्ट homemade business ideas in marathi आवडली असेल, तर post ला शेयर नक्की करा.

धन्यवाद !

Also Read:

Leave a Comment