घरी बसून व्यवसाय कोणता करावा ? 2024

मित्रांनो, बऱ्याच लोकांना असे वाटते की घरी बसून व्यवसाय करने खुप अवघड आहे पण अस नाहीये. आज तुम्ही घरी बसून चांगला Business करू शकता आणि खुप पैसे सुद्धा कमवू शकतात.

मित्रांनो, आज व्यवसाय म्हणा किंवा नौकरी, प्रत्येक क्षेत्रातच प्रतिस्पर्धा खुप जास्त वाढली आहे. तरी त्यातल्या त्यात नौकरी पेक्षा व्यवसायात लोकांना भविष्यातील जास्तं संभावना दिसत आहेत. तर खुपसे उच्च शिक्षण घेतलेले लोकं सुद्धा नौकरीच्या नादात न लागता, सरळ व्यवसाया कडे वळताय.

घरी बसून व्यवसाय

मित्रांनो, तुम्हाला ही जर का तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर साहजिकच काही प्रश्न तुमच्या मनात असतीलच. स्वतः चा व्यवसाय कसा सुरु करायचा, व्यवसाय कोणता करावा, किंवा घरी करता येणारे व्यवसाय कोणते असु शकतात इत्यादी अनेक प्रश्न तुम्हालाही नक्कीच पडत असतील. त्यात जर तुम्ही गावात रहात असाल तर आणखी एक प्रश्न की तुम्हाला गावात राहुन सुद्धा व्यवसाय करता येईल का?

मित्रांनो, व्यवसाय जर का आपल्या मनासारखा असेल आणि त्यातही जर तो घरबसल्या करता येणं शक्य असेल तर, त्या पेक्षा चांगली गोष्ट आणखी काय असेल. 

मित्रांनो, गावात राहुन जर का तुम्हाला तुमचा स्वत: चा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही आरामात सुरू करु शकतात कारण आज आपली गावं सुद्धा चांगलीच develope झालेली आहेत.

तर चांगला व्यवसाय फक्त शहरातच राहुन करता येतो असं नाही तर गावात राहुन सुद्धा आपण व्यवसाय करु शकतो. मुख्य म्हणजे महिला असो किंवा पुरुष दोघेही हे व्यवसाय सहज रित्या करु शकतात. कारण आज कोणतंच क्षेत्र महिला किंवा पुरुष ह्या बंधनात अडकलेलं नाही आहे. 

तर मित्रांनो, आजच्या ह्या article  मध्ये आपण पाहणार आहोत, काही असे व्यवसाय जे तुम्हाला गावात राहुन सुद्धा करता येतील, शिवाय हे ही पाहुया की तुम्हाला जर का तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा असेल तर त्या करता तुम्हाला कोणते व्यवसाय करता येतील.

काही व्यवसाय असे आहेत जे सरळ, सोपे आणि घरी करता येतील आणि काही व्यवसाय करायला मात्र proper training ची गरज लागतेच. चला तर मग सुरू करुया.

घरच्या आरामखुर्चीतूनच व्यवसाय करून चांगले पैसे कमावण्याची स्वप्ने पाहणाऱ्यांसाठी हे लेखन आहे. घरबसल्या सुरु करता येणारे काही सर्वोत्तम व्यावसायिक पर्याय पाहू:

1. ब्लॉगिंग/यूट्यूबिंग

ब्लॉगिंग आणि यूट्यूबिंग हा घरबसल्या सुरु करता येणारा सर्वात पसंतीचा ऑनलाइन व्यवसाय. घरच्या आरामखुर्चीतूनच विषय निवडा व लेखन/व्हिडिओ कन्टेंट तयार करा. यातून तुम्ही लाखो रुपये कमावू शकता.

2. ऑनलाइन ट्यूशन

ऑनलाइन कोर्सेस, ट्यूशन क्लासेस देऊन घरबसून पैसे कमवा. विद्यार्थ्यांना Zoom/Skype वापरून ऑनलाइन शिकवा. तुमच्या क्षेत्रातील तज्ञ म्हणून इतरांना मार्गदर्शन करा.

3. फ्रीलान्सिंग

जर तुम्ही developer, designer, writer असाल तर freelancing platforms वर जा व तुमची सेवा द्या. घरबसूनच इंटरनेट वापरून पैसे कमावता येतील.

4. ऑनलाइन ट्रेडिंग

शेअर बाजारात गुंतवणूक करा. Cryptocurrency मध्ये ट्रेडिंग करून नफा कमावा. यासाठी फक्त इंटरनेटच लागेल.

5. ड्रॉपशिपिंग

इतर कंपन्यांची उत्पादने स्वत: डिलीव्हर करणे आणि कमिशनवर विक्री करणे. Amazon, Flipkart साठी dropshipping करता येईल.

याखेरीज अन्य पर्याय म्हणजे पेटीएम, मोबाईल/वेब अॅप डेव्हलपमेंट, अॅफिलिएट मार्केटिंग, बेकरी/केटरिंग वगैरे. तुमच्याही घरच्या आरामातून यशस्वी व्यावसायिक जीवन सुरु करण्याची संधी आहे!

6. खानावळ किंवा स्वतः चं छोटंसं घरगुती रेस्टॉरंट

मित्रांनो, आज बरेच लोकं असे आहेत जे कोणत्या ना कोणत्या कारणाने आपलं गाव आणि घर सोडून दुसऱ्या ठिकाणी कामा साठी जातात, विद्यार्थी म्हणून शिकायला जातात किंवा नौकरीच्या शोधात जातात आणि एकटे राहतात.

शिवाय अन्य काही कारणांमुळे जर का जेवण बनवणं शक्य नसेल तर अशे लोक नेहमी घरगुती जेवणाच्या शोधात असतात कारण हॉटेलचं तेच ते एक सारख्या चवीचं जेवण स्वास्थ्य आणि पॉकेट दोन्ही दृष्टीने परवडण्यासारखे नसते. तर तुम्ही तुमचं स्वतः चं एक जेवणाचं घरगुती खानावळ व्यवसाय सुद्धा उघडू शकता.

आणि त्याच बरोबर टिफिन सेंटर पण सुरू करु शकतात.  त्या साठी तुम्हाला गैस, काही मोठी भांडी, जेवायची भांडी, पेकिंग मटेरियल आणि इतर सामग्री ची गरज असते. तुम्हाला तुमच्या घरच्या kitchen पासुनच सुरु करता येणारा व्यवसाय आहे हा, फक्त थोडीशी ट्रेनिंग आणि थोडं भांडवल म्हणजे investment ची गरज आहे.

खानावळ हा व्यवसाय अगदी उत्तम आहे, भरपूर income सुद्धा आहे पण मेहनत सुद्धा तेवढीच आहे. तुम्हाला नेहमी सतर्क राहून लोकांच्या आरोग्य आणि hygiene चं सुद्धा फार लक्षं ठेवावं लागेल. कोणत्याही प्रकारची लापरवाही इथे चालत नाही. पण एकदा सवय आणि नाव झालं की मग सगळं छान जमतं.

2. Cake/ bakery items आणि chocolate

मित्रांनो, आज bakery ह्या क्षेत्रात सुद्धा भरपूर संभावना उद्भवलेल्या आहेत. आज cake फक्त, birthday लाच नाही तर, कधीही आणि कोणत्या ही function ला किंवा असच खाण्याची पद्धत आहे. तसेच chocolate सुद्धा लोकांना खूप आवडतात. 

Cake, pastry, chocolate च्या रुपात, gift द्यायला आणि घ्यायला लोकांना खुप आवडतं कारण आजकल इतक्या variety चे chocolate आणि बेकरी आइटम्स बनतात की तुम्ही कल्पना सुद्धा नाही करु शकत. आणि ते ही homemade. तर तुम्ही पण थोडीशी training घेऊन, तुमचं स्वतः चं homemade cake/ chocolate चा व्यवसाय उघडू शकता.

3. पापड, लोणची, चिप्स, मसाले आणि फराळाचे पदार्थ

मित्रांनो, आजकाल फार कमी लोकं घरी पापड लोणची किंवा इतर पदार्थ बनवतात, आजकालच्या busy lifestyle मध्ये, घरी हे सगळं करायला वेळ नसतो तर लोकं हे सगळं सरळ readymade विकत घेतात.

तर तुम्हाला जर जमत असेल तर तुम्ही थोडी मशीनरी घेऊन, ह्या क्षेत्रात तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करु शकतात. हा एकदम सोपा व्यवसाय आहे. ह्याच बरोबर, मोमबत्ती, अगरबत्ती, साबण इत्यादी वस्तू बनवून विकू शकतात.

Also Read:

4. Boutique/ tailoring

मित्रांनो, तुम्हाला जर का शिवण कामात interest असेल आणि तुम्ही tailoring ची training घेतली असेल तर तुम्ही घरातल्या घरात किंवा अगदी लहान जागेत सुद्धा आपलं एक बुटीक उघडू शकता.

आजकाल, गाव असो किंवा शहर, कोणत्या ही function साठी designer कपडे घालायचं trend सुरू झालं आहे. तर तुम्हाला सुद्धा आपलं बुटीक सुरू करुन व्यवसाय करता येईल.

5. Salon

हो मित्रांनो, तुम्ही तुमचे स्वतः चे salon घरच्या घरी उघडू शकता. आज सौंदर्य क्षेत्रात, खुप मोठा boom आला आहे आणि रोज नवीन नवीन प्रयोग सुद्धा होत आहेत. आज parlour हे शब्द फक्त महिलांसाठी मर्यादित नाही आहे तर मोठ्या प्रमाणात पुरुष सुद्धा parlour मध्ये जातात. 

कमीतकमी जागेत सुरू करता येणारा हा व्यवसाय आहे, पण काही अत्यावश्यक गोष्टी तुमच्या कडे असणं गरजेचं आहे. जे एका parlour किंवा salon मध्ये असतात. शिवाय तुम्हाला proper training पण घ्यावी लागणार आहे. पण एकदा जम बसला की तुम्हाला ह्या क्षेत्रात खूप पैसे कमवता येतील.

6. कपड्यांचा आणि इतर वस्तुंचा व्यवसाय

मित्रांनो, तुम्ही तुमचा स्वतःचा कपड्यांचा व्यवसाय सुरू करु शकतात. तुम्ही विविध प्रकारचे कपडे wholesale rate मध्ये आणुन विकू शकतात. त्या कपड्यांमध्ये मुख्यतः लहान मुलांचे कपडे, undergarments, napkins इत्यादी तुम्ही विकू शकतात.

ह्या शिवाय, cosmetic, plastic च्या वस्तू, artificial jewellery, स्वेटर इत्यादी सुद्धा विकू शकतात. गावाकडे हे व्यवसाय खुप चालतात म्हणून यांना गावाकडचे व्यवसाय म्हंटले जातात.

7. Mobile shop

मित्रांनो, आज प्रत्येक माणूस mobile वापरतो, mobile शी related असे खुप कामं आहेत, जे तुम्हाला करता येतील. आणि ह्या कामात पण चांगलीच income होऊ शकते.

Mobile recharge, नवीन SIM card/ connection देणें, एखाद्या कंपनीला ग्राहक करुन देणे, आणि त्याच बरोबर विविध mobile accessories जसं mobile cover, headphones, chargers इत्यादीच एक छोटंसं दुकान काढू शकतात.

8. फळं आणि भाज्या

हो मित्रांनो, आजकाल organic food खायचा लोकांनी नवा आणि चांगला trend सुरू केला आहे कारण chemical चे भरमसाठ वापर केलेल्या भाज्या आणि फळे खाणं आरोग्याच्या दृष्टीने बिलकुल चांगले नाही आहे.

तर तुमच्या कडे जर का अशी जागा असेल जिथे तुम्हाला organic रुपाने फळं आणि भाज्या उगवता येतील तर तुम्ही सुद्धा आपल्या घरात छोटंसं farm सारखं करुन त्यात भाज्या आणि फळं उगवू शकतात आणि त्या विकू शकतात. हा ही घरबसल्या व्यवसाय करायचा छान पर्याय आहे.

Conclusion:

तर मित्रांनो, तुम्हाला हे आर्टिकल घर बसून व्यवसाय चांगले वाटले असेल तर ह्याला शेयर नक्की करा.

धन्यवाद.

Also Read:

महिला गृह उद्योग |How to Start Mahila Gruh Udhyog in Marathi

18 फायदेशीर Business ideas in Marathi

व्यवसाय मार्गदर्शन मराठी

Leave a Comment