नमस्कार, आपल्यासाठी आनंदाची बातमी ,माझी लाड़की बहिण योजना २०२४ महाराष्ट्राचे अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजीत दादा पवार यांनी नुकतीच लागू केली आहे या योजनेनुसार प्रत्येक पात्र महिला भगिनींला १५०० रुपये प्रति महीना मिळणार.
तो कसा मिळणार? काय पात्रता असेल? कोणती कागदपत्रे लागतील? कसा अर्ज करवा? ही सगळी माहिती तुम्हाला यात मिळेल त्यासाठी ही माहिती शेवट पर्यंत वाचा आणि नक्कीच १५०० रूपयाचा लाभ घ्या.
लाडकी बहीण योजनासाठी पात्रता
लाड़की बहीण योजना २०२४ यासाठी काही पात्रता महाराष्ट्र सरकारने ठेवल्या आहेत सुरवातीला ठेवलेल्या काही पात्रता मध्ये नवीन चांगले बदल झालेले आहेत त्यामुळे तुम्हाला या योजनेचा लाभ घेणे अगदी सोपे झाले आहे.
1] २१ ते६५ वयोगट मधे येणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल.
२] कुटुंबातील उत्पन्न २.५० लाखा पर्यंत मर्यादित असावे.
टिप: यामध्ये आता तुम्हाला उत्पन्न दाखला लागणार नाही याआधी ही तरतूद होती आता नाही हे लाक्षात घ्या त्त्या ऐवजी शाळा सोडल्याचा दाखला देउ शकता/जन्माचा दाखला देऊ शकता.
३] ज्या महिलेला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्या महिलेचे रेशन कार्ड/कूपन मधे नाव नोंद असणे गरजेचे आहे.
टिप: रेशन कार्ड मधे नाव नसलेल्या महिलांनी लवकरनोंदणी करावी जेणेकरून लवकरात लवकर या योजनेचा लाभ घेऊ शकाल.
४] ज्या महिलांचे बँक मधे खाते खोललेले/उघडले नसेल त्यांनी आपले स्वतः चे खाते खोला/उघड़ा.
५] प्रत्येक महिला भगिनीचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
माझी लाडकी बहिन या मधील नवीन बदल
माझी लाडकी बहिण यात काही अपात्रता होत्या परंतु त्यात काही नवीन बदल झाले.
1] महाराष्ट्र सरकार ने ५ एकर जमीन ची अट केली होती ती काढलेली आहे .५ एकर च्या पुढे असेल तरी तुम्हला याचा लाभ घेता येईल
२] या योजनेत अविवाहित मुलींला लाभ नव्हता त्यांना देखील याचा लाभ घेता येणारआहे.
3] एका कुटुंबातील एक विवाहित आणि एक अविवाहित महिलेला लाभ घेता येईल
4] डोमासाईल ची गरज आता नाही लागणार ती अट रद्द केली आहे.
लाडकी बहीन योजना अर्ज करण्याची/ फॉर्म भरण्याची पद्धती
वरील प्रमाणे माहिती तुम्हाला नक्कीच कळली असेल परंतु सर्व महिलांना अर्ज कसा करावा हाच प्रश्न पडला असेल, त्यात अवघड अस काही नाही त्यामुळे काळीज करू नका अर्ज तुम्ही ऑनलाईन आणि ऑनलाईन आशा दोन्ही पध्दतीने करू शकता.
गावाकडील ज्या काही महिला आहेत त्यांना ऑनलाईन पद्धतीने जास्त समजत नसेल किंवा माहिती हवी असेल तर त्यासाठी महाराष्ट्र सरकारने अंगणवाडी सेविका/बालवाडीतील बाई यांच्याकडे ही जबाबदारी दिली आहे. त्यामुळे तुम्ही त्यांच्याजवळ तुमचे नाव नोंदणी करा आणि त्या सांगतील तेव्हा कागदपत्रांची पूर्तता करा .
ऑनलाईन पद्धतीने सेतू कार्यालयात किंवा जिथे ऑनलाईन अर्ज केला जातो तिथे तुम्ही त्या व्यक्तीला सांगून अर्ज भरून घेऊ शकता, त्याआधी तुमची कागदपत्रे तयार ठेवा .
तुम्हाला अर्ज करण्यास उशीर होत असेल तर काळजी करू नका, कारण माननीय मुख्यमंत्री साहेबांनी मुदतीची अट यात बदल केला आहे. पहिली मुदत १५ जुलै पर्यंत होती आता ६० दिवस म्हणजे २ महीने वाढून दिली आहे. त्यामुळे तुमचा अर्ज हा व्यवस्थित करून घ्या जेव्हा तुमचा अर्ज होईल तेव्हा तुम्हाला लाडकी बहीण योजना लागू झालेल्या तारखे पासूनची रक्कम मिळेल .
अशा पध्दतीने तुम्ही ही माहिती नीट वाचा अर्ज करा आणि माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ घ्या माहिती आवडल्यास तुमच्या मित्रांना, बहिणीला शेयर करा.
वरील माहीत व्यवस्थित समजली नाही किंवा तुम्हाला काही अडचण आली तर खाली दिलेल्या व्हाट्सएप ग्रुपला जॉईन करा.
माझी लाडकी बहीन योजना GR PDF
माझी लाडकी बहीन योजनेसाठी फॉर्मची लिंक https://cdn.s3waas.gov.in/s345fbc6d3e05ebd93369ce542e8f2322d/uploads/2024/07/2024070499.pdf
लाडकी बहीण योजनेसाठी App लिंक
Ladki bahini yojana online apply link
धन्यवाद.