महाराष्ट्र राज्यातील  मंत्रिमंडळ विस्तारावरून शिंदे गटात प्रचंड नाराजी निर्माण झाली. मात्र,

मंगळवारी ९.३० वाजता शिंदे गटाच्या आमदारांची बैठक सह्याद्री अतिथीगृहावर आयोजित करण्यात आली तेव्हा,

या बैठकीत सह्याद्री अतिथीगृहावर  मंत्रिमंडळासाठी निश्चित झालेली ९ नावे जाहीर करण्यात आली.  

मात्र, शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील आणि संजय शिरसाट यांनी 

अशाप्रकारची कोणतीही नाराजी नसल्याचे सांगत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

ऐनवेळी अब्दुल सत्तार आणि संजय राठोड यांना मंत्रिमंडळात सामावून घेण्यात आले. त्यामुळे 

औरंगाबाद जिल्ह्यातील आमदार संजय शिरसाट प्रचंड नाराज झाल्याचे सांगितले जात आहे. त्यांनी   

थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर परखडपणे आपली भूमिका मांडल्याचे समजते.  

मुळे शिंदे गटात प्रचंड धुसफूस असल्याचे चित्र रंगवले जात होते.